ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Crime News

Crime News : बँक मॅनेजरने  जुगार खेळण्यासाठी ग्राहकांनी बँकेत गहाण ठेवलेल्या 3 कोटींच्या सोन्यावर डल्ला मारला आहे.मुंबईतील भांडुप येथील SBI बँकेत विचित्र प्रकार घडला आहे. 

Crime News : एकदा जुगाराचे व्यसन लागले की माणसाला कशाचेच भान राहत नाही. जुगारामुळे अनेकांचे आयुष्य आणि संसार उद्धवस्त झाल्याचे देखील आपण पाहिले आहे. मुंबईतील भांडुप परिसरात एक अत्यंत विचित्र प्रकार घडला आहे. एसबीआय बँकेमध्ये तारण ठेवलेले ग्राहकांचे तीन करोड चे सोने बँक व्यवस्थापकाने ऑनलाइन रमी गेम मध्ये पैसे लावण्यासाठी लुटले आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

27 फेब्रुवारी रोजी मनोज म्हस्के रजेवर असताना प्रशासक अमित कुमार यांच्याकडे लॉकरची जबाबदारी होती. त्यांनी कोअर बँकिंग सिस्टीममध्ये (CBS) तशी नोटही दाखल केली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कुमार लॉकरमध्ये रोख रक्कम आणि दागिने जमा करण्यासाठी गेले असता त्यांना सोन्याच्या दागिन्यांची अनेक पाकिटे गायब असल्याचे दिसले. त्यांनी कागदपत्रे व्यवस्थित तपासली असता, बँकेच्या या शाखेने सोनं तारण ठेवून 63 ग्राहकांचे सोने तारण ठेवून कर्जे दिली होती. लॉकरमध्ये असलेल्या 63 सोन्याच्या पाकिटांपैकी 59 पाकिटे गहाळ झाली होती. लॉकरमध्ये केवळ 4 पाकिटे शिल्लक होती. अमित कुमार यांनी ही बाब बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. 

बँक अधिकाऱ्यांनी सुट्टीवर असलेल्या सर्व्हिस मॅनेजर मनोज म्हस्के याला तातडीने पाकिटाबाबत चौकशी केली. मस्के यांने दागिने गहाळ केल्याची कबुली देत यापैकी काही सोने दुसरीकडे तारण ठेवले तर काही सोन विकल्याची कबुली दिली. मी लवकरच सोने परत करतो असे बोलून त्याने बँकेकडे वेळ मागून घेतला. परंतु बँकेने त्याला कुठलाही वेळ न देता भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सोने तारण ठेवून मिळालेले पैसे मनोज मस्के याने ऑनलाईन रमी गेम मध्ये लावल्याची यावेळी पोलिसांना दिली दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास भांडुप पोलीस करीत आहे.

Crime News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Crime News
Crime News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Crime News
Share the Post:
error: Content is protected !!