ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Crime news

Crime News : गेल्या आठवड्यामध्ये मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात कुरिअर सर्व्हिसच्या वाहनाला चोरट्यांनी लुटले होते. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.(Crime News)

Crime News  : गेल्या आठवड्यामध्ये मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात कुरिअर सर्व्हिसच्या वाहनाला अडवण्यात आले. संशयितांनी वाह्तानातील व्यक्तींना शस्त्राचा धाक दाखवत सुमारे तीन कोटींचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी पाच संशयितांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.

18 जानेवारी रोजी मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात बजरंग कुरिअर सर्व्हिसेस कंपनीची कुरिअर व्हॅन मुंबईकडून नाशिककडे प्रवास करत होती. यावेळी कारमधून आलेल्या पाच ते सहा संशयितांनी कुरिअर व्हॅनला अडवले. तसेच कुरिअर व्हॅनच्या चालकाच्या डोळ्यात मिरची पुड फेकली.त्यानंतर व्हॅनमधील इतरांना लोखंडी रॉडचा धाक दाखवण्यात आला. व्हॅनमधील 3 कोटी 67 लाख 55 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरांनी लंपास केले. घोटी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्थानिक गुन्हेशाखेने दरोडेखोरांची ओळख पटवण्यास सुरुवात केली. दरोडेखोर उत्तरप्रदेशातील आग्रा परिसरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तीन दिवस पाळत ठेवल्यानंतर पोलिसांनी पाच संशयितांना जेरबंद. यात दोन माजी सैनिकांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.देवेंद्रसिंग उर्फ करवा सतवीर परमार (33), आकाश रामप्रकाश परमार (22, दोघे रा. ता. खेरागड, जि. आग्रा, राज्य उत्तरप्रदेश), हुबसिंग मुल्लासिंग ठाकूर (42, रा. चेंकोरा, राज्यस्थान), शिवसिंग बिजेंद्रसिंग ठाकूर (45) व जहिर खान सुखा खान (52, रा. ता. खेरागड, जि. आग्रा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यापैकी हुबसिंग ठाकूर व जहिर खान हे माजी सैनिक आहेत. 

संशयितांनी दरोड्यात चोरलेले सोन्याचे व चांदीचे दागिने जमिनीत गाडून ठेवले होते. सखोल तपासात पोलिसांनी अडीच किलो सोने व ४५ किलो चांदीचे दागिने आणि दरोडा टाकण्यासाठी वापरलेली कार असा सुमारे पावणे दोन कोटीं रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.न्यायालयाने संशयितांना ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरोड्याचा मुख्य सुत्रधार देवेंद्रसिंग याच्याविरोधात गुजरात राज्यातही दरोडा टाकून सोने चोरी केल्याचे उघड झाले आहे. गुन्ह्यातील संशयित सतेंदरसिंग यादव (रा. भोजपूर, जि. आग्रा) या माजी सैनिकासह दालचंद गुर्जर (रा. खेरागड, जि. आग्रा) व नंदु गारे (रा. ता. चांदवड, जि. नाशिक) हे संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Crime News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Crime News
Crime News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Crime News
Share the Post:
error: Content is protected !!