ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Crime News

Crime News : जेवणात त्रुटी काढल्याने पत्नीने पतीवर सुरीने वार केले आहे. पुण्यातील हडपसर परिसरातून ही घटना समोर आली आहे. कांदा कापत असताना त्याच सुरीने पतीवर वार केला आहे.  

Crime News : जेवणात त्रुटी काढल्याने पत्नीने पतीवर सुरीने वार (Crime news) केले आहे. पुण्यातील हडपसर परिसरातून ही घटना समोर आली आहे. हडपसरमध्ये पती रोज जेवणामध्ये त्रुटी काढतो म्हणून पत्नीने रागात येऊन पतीवर कांदा कापत असताना त्याच सुरीने पतीवर वार केलाची घटना घडली आहे. या विरोधात पत्नीविरोधात हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला करण्यात आला. 

नमिता श्रवण माने असं वार करणाऱ्या महिलेच नाव असून श्रवण माने असं वार झालेल्या पतीच नाव आहे. पती रोज जेवणा मध्ये त्रुटी काढतोय याचा राग मनात साठवत 1 फेब्रुवारीला रात्री साडेबाराच्या सुमारास पती घरी आल्यानंतर सुद्धा पत्नी जेवण बनवत होती हे पाहून नवऱ्याला राग आला एवढा रात्री होऊन सुद्धा अजून जेवण तयार नाही झालं,या वरून किरकोळ वाद झाला. नंतर पती जेव्हा जेवण करत होता तेव्हा नेहेमी प्रमाणे जेवणात त्रुटी काढली याचा राग पत्नीला अनावर झाला आणि थेट कांदा कपणाऱ्या सूरीने पतीच्या हातावर वार केला. या प्रकरणी हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.

सध्या पुण्यात कौटुंबिक वाद वाढत आहे. त्यात असे प्रकार समोर येत आहे.  काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील वानवडी पोलीस  स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना उघडकीस आली होती. पत्नीने केलेल्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिक असलेल्या पतीचा मृत्यू झाला होता. घरगुती भांडणातून वाद झाल्यानंतर पत्नीने पतीच्या तोंडावर ठोसा मारला होता. निखिल पुष्पराज खन्ना (वय 36) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव होतं. रेणुका निखिल खन्ना (वय 38) यांना वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. निखिल आणि रेणुका यांचा सहा वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. दरम्यान दोघांमध्ये भांडण झाले.

Crime News

रागाच्या भरात पत्नी रेणुका हिने पतीच्या तोंडावर ठोसा मारला. त्यानंतर तिने फोन करून सासरे असलेल्या डॉक्टर खन्ना यांना याची माहिती दिली. डॉक्टर खन्ना घरी आले आणि त्यांनी निखिल यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही आणि निखिल यांचा मृत्यू झाला होता. मयत निखिल हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक होते. 

Crime News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Crime News
Crime News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Crime News
Share the Post:
error: Content is protected !!