ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Crime News

Crime News : पिंपरी-चिंचवडमधील एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या दोन स्टंटबाजला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दो बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून कारदेखील जप्त केली आहे.

Crime News : पिंपरी-चिंचवडमधील एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (viral Video) झाला होता. धावत्या चारचाकी गाडीच्या टपावर बसून हा तरुण स्टंटबाजी करताना व्हिडिओमध्ये दिसल होता. या दोन स्टंटबाजला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दो बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून कारदेखील जप्त केली आहे.

भरधाव कारचा छतावर बसून स्टंटबाजी करणे दोन तरुणांच्या चांगला  महागात पडलंय या स्टंटबाजीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्या तरुणांचा तातडीने शोध घेत दोन तरुणांना अटक केली. प्रतीक शिंगटे आणि ओमकार मुंडे अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.या दोघांवरही भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची कारही जप्त करण्यात आले आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता. जीवावर बेतेल अशा पद्धतीने धावत्या चारचाकी गाडीच्या टपावर बसून तरुण स्टंटबाजी करतो आहे. हा व्हिडीओ पिंपरी- चिंचवड शहरातील असून तरुणावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या व्हिडीओत अत्यंत बिनधास्तपणे हा तरुण गाडीच्या टपावर बसलेला दिसत होता. त्याला त्याला कुठलीच भीती नाही, असं व्हिडिओतून स्पष्ट होत आहे.

या व्हिडिओच्या आधारे तरुणाचा शोध घेऊन त्यावर कडक कारवाई करणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी माहिती दिली होती. अशा पद्धतीने कोणीही स्टंटबाजी करू नये असं आवाहन ही पोलिसांनी केलं होतं. अखेर त्यांना गाठून पोलिसांनी अटक केली. 

Crime News
Crime News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Crime News
Crime News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Crime News
Share the Post:
error: Content is protected !!