ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Crime News

Crime News : पुण्यात सध्या  हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दापाश (Sex Racket) केला जात आहे. बालेवाडी येथील हॉटेल टॅग हाऊस आणि प्लॅन कार्ड क्लब रोडवर असलेल्या स्नेह अपार्टमेंटमध्ये  छापेमारी करीत पोलिसांनी परराज्यातील आणि पुण्यातील अशा 11 तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका केली.(Pune Crime News)

Crime News : पुण्यात सध्या  हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दापाश (Sex Racket) केला जात आहे. मागील काही दिवसांपासून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे शहरावर करडी नजर आहे. बालेवाडी येथील हॉटेल टॅग हाऊस (Hotel Tag House)  आणि प्लॅन कार्ड क्लब रोडवर असलेल्या स्नेह अपार्टमेंटमध्ये (Sneh Apartment)  छापेमारी करीत पोलिसांनी परराज्यातील आणि पुण्यातील अशा 11तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका केली. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. 

या प्रकरणी पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रॉकी कदम, राहुल मदन उर्फ मदन संन्यासी, दिनेश उर्फ मामा, नवीन आणि रोशन अशी या गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावं आहे. ऑनलाइन पद्धतीने आणि व्हाट्सअप क्रमांकावरून हे वेश्या व्यवसायाचे रॅकेट चालवले जात होते. काही दिवसांपूर्वी सामाजिक सुरक्षा विभागाने विमान नगर येथे कारवाई करीत मुंबईच्या एका अभिनेत्रीला वेश्याव्यवसाय प्रकरणी ताब्यात घेतले होते. त्या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेला राहुल मदन उर्फ मदन संन्यासी हाच चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणाची पुढील चौकशी केली असता शहरात काही ठिकाणी असेच सेक्स ऱॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून थेट  हॉटेल टॅग हाऊस या ठिकाणी छापा टाकला. तब्बल 11 तरुणींची सुटका करण्यात आली आहे. 

सध्या पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे पुण्यात सध्या पोलिसांनी वेगवेगळ्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. त्यात रात्रीच्या वेळी गस्त घालण्यापासून तर खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यावर सापळा रचून छापा टाकण्यापर्यंत पोलीस उपाययोजना करण्यात येत आहे आणि अनेक अवैध व्यवसायावर कारवाई देखील करण्यात येत आहे. मात्र, अवैध व्यावसाय काही बंद होण्याचं नाव घेत नसल्याचं शहरात घडत असलेल्या घटनांवरुन दिसत आहे.  पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. अनेक हायप्रोफाइल प्रकरणे उघडकीस आणली होती. मसाज पार्लर स्पाच्या नावाने चालणाऱ्या व्यवसायांवर करडी नजर ठेवली जाणार असून नागरिकांना असं काही आढळल्यास थेट तक्रारी कराव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

Crime News
Crime News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Crime News
Crime News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Crime News
Share the Post:
error: Content is protected !!