ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

cyber crime

Cyber Crime : कुरिअर सेवेचा हा वाढता वापर सायबर चोरांच्या चांगलाच पथ्यावर पडला आहे. कुरिअर सेवेचा वाढता वापर पाहून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी(Cyber Crime) हा मार्ग निवडला आहे.

Cyber Crime : सध्या पोस्टाच्या वापरापेक्षा खासगी कुरिअरने एखादे पत्र किंवा वस्तू पाठवण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र कुरिअर सेवेचा हा वढता वापर सायबर चोरांच्या चांगलाच पथ्यावर पडला आहे. कुरिअर सेवेचा वाढता वापर पाहून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर(Cyber Crime) गुन्हेगारांनी हा मार्ग निवडला आहे. त्याचाच एक भाग म्हणून तुमच्या नावे आलेल्या कुरिअरमध्ये ड्रग्ज, तसेच महागड्या प्रतिबंधित वस्तू असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. आपण सीबीआय, तसेच गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून लाखो रुपये उकळले जात आहेत. अशा प्रकारचे अनेक गुन्हे भोईवाडा, दादर, शिवाजी पार्कसह मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

अशीच एक घटना एका खासगी कंपनीत अधिकारी असलेल्या दादरच्या विजयकुमार (बदललेले नाव) याच्यासोबत घडली. त्याला फसवून त्याच्या मेहनतीच्या लाखो रुपयांवर डल्ला मारण्यात आला. दादरच्या विजयकुमार यांना एका कुरिअर कंपनीच्या कथित कर्मचाऱ्याने फोन केला आणि तुम्ही रशिया येथे पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज होते. ते गुन्हे शाखेने जप्त केले आहेत, अशी माहिती दिली. मात्र हे ऐकून विजयकुमार यांना मोठा धक्का बसला. आपण असं कोणतंच पार्सल पाठवलेलं नाही असे त्याने समोरच्या व्यक्तीला सांगितलं.

त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एका अधिकाऱ्याचा विजयकुमार यांना फोन आला. या प्रकरणात गुन्हा दाखल करायचा नसेल तर तुम्हाला एक ॲप डाऊनलोड करावे लागेल आणि त्यामध्ये काही माहिती भरून द्यावी लागेल असेल सांगितले. पुन्हा फोन आल्याने घाबरलेल्या विजयकुमार याने हे प्रकरण लवकरात लवकर संपवण्याच्या नादात ती माहिती भरण्यास होकार दर्शवला. त्याप्रमाणे त्याने ते ॲप डाऊनलोड करून, त्यात माहिती भरण्यास सुरूवात केली.

मात्र त्याचवेळी, त्याच्या बँक खात्यामधून तब्बल 4 लाख 83 हजार रुपये परस्पर काढण्यात आले. शिवाजी पार्क येथील महिलेलाही अशाच प्रकारे गंडा घालण्यात आला. पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत आणइ आणि बँक खात्यातून मनी लाँड्रिंग झाल्याचे सांगून या महिलेकडून दोन लाख रुपये उकळण्यात आले. सायबर गुन्हेगारांच्या फसवणुकीच्या या नव्या तंत्रामुळे सामान्य नागरिक मात्र त्रस्त झाले असून, मेहनतीचे पैसे गमवावे लागल्याने त्यांच्या मनस्तापात भर पडली आहे.

Cyber Crime

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Cyber Crime
Cyber Crime

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Cyber Crime
Share the Post:
error: Content is protected !!