ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Doctor Strike

Doctor Strike in Maharashtra : आज सायंकाळी पाच वाजल्यापासून निवासी डॉक्टर विविध मागण्यांसाठी संपावर जाणार असून, निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेवर ताण पडू शकतो.(Doctor Strike)

Doctor Strike in Maharashtra : आपल्या तीन प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी संपाची हाक (Doctors Strike Maharashtra) दिली असून, आज (22 फेब्रुवारी) संध्याकाळी पाच वाजेनंतर निवासी डॉक्टर संपावर जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या (Maharashtra Resident Doctors) संपाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठक बोलावली आहे. आज सायंकाळी पाच वाजल्यापासून निवासी डॉक्टर विविध मागण्यांसाठी संपावर जाणार असून, निवासी डॉक्टरांच्या (Resident Doctors) संपामुळे रुग्णसेवेवर ताण पडू शकतो.

त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी आज मार्ड संघटनेच्या डॉक्टर प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावलं आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील बैठका झाल्या असून, सरकारने आश्वासन दिले होते. मात्र, ते पूर्ण न केल्यामुळे डॉक्टरांनी पुन्हा एकदा हा संप पुकारला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत नक्की काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

निवासी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या…

  • निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.
  • निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी.
  • निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे.

निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन वेळेवर मिळत नाही. तसेच निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था नसल्याने त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. सोबतच निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे, या मागण्यासाठी निवासी डॉक्टरांनी यापूर्वी 7 फेब्रुवारीपासून संपावर जाण्याची घोषणा केली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निवासी डॉक्टरांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्याची बैठक बोलावून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यामुळे संप स्थगित करण्यात आला होता. मात्र, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने आजपासून पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांनी घेतला आहे. 

हसन मुश्रीफांनी बोलावली बैठक…

निवासी डॉक्टरांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून हे निवासी डॉक्टर संपावर जाणार आहे. दरम्यान, यच पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक महत्वाची बैठक बोलावली आहे. मार्ड संघटनेच्या डॉक्टर प्रतिनिधींना चर्चेसाठी या बैठकीत बोलवण्यात आले आहेत. त्यामुळे या बैठकीतून काही तोडगा निघतो का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

Doctor Strike

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Doctor Strike
Doctor Strike

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Doctor Strike
Share the Post:
error: Content is protected !!