ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Accident

Accident : रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरवर भरधाव आलेली मारुती ईरटीगा कार आदळून झालेल्या भीषण अपघातात कारचालक ठार झाला.

Accident : रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरवर भरधाव आलेली मारुती ईरटीगा कार आदळून झालेल्या भीषण अपघातात कारचालक ठार झाला. ही घटना नगर सोलापूर महामार्गावर साकत (ता. नगर) गावच्या शिवारात असलेल्या शिवसागर हॉटेलसमोर सोमवारी (दि.१८) पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली.मैनुद्दीन कलंदर शेख (वय ४५, रा. कोयाळ, ता. आष्टी, जि. बीड), असे मयताचे नाव आहे. मयत शेख हे त्यांची मारुती ईरटीगा कार (क्र. एम एच १६ सी वाय ८९४३) घेवून नगरहून सोलापूर महामार्गाने सोमवारी पहाटे कोयाळ गावाकडे जात असताना साकत (ता. नगर) गावच्या शिवारात असलेल्या शिवसागर हॉटेलसमोर रस्त्यात एक कंटेनर उभा होता.

कार वेगात असल्याने त्यांना कंटेनरचा अंदाज न आल्याने कार पाठीमागून जोरात कंटेनरवर आदळली. या अपघातात कारचा चक्काचूर होऊन चालक शेख हे गंभीररित्या जखमी झाले. अपघाताचा आवाज आल्याने आजूबाजूचे नागरिक जमा झाले. त्यांचे चुलत भाऊ शब्बीर अब्दुल शेख हेही तेथे आले.त्यांनी जखमी शेख यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील मेडिकल ऑफिसर डॉ. ढगे यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. गणेश लबडे हे करत आहेत.

Accident

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Accident
Accident

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Accident
Share the Post:
error: Content is protected !!