ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Pratibhatai Patil

Pratibhatai Patil : प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Pratibhatai Patil : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील(Pratibhatai Patil) यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. निवृत्त झाल्यापासून प्रतिभाताई पाटील पुण्यातच राहत आहेत. दरम्यान बुधवारी (13 मार्च) रोजी त्यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

बुधवारी म्हणजेच (13 मार्च) रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातील भारती हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी त्यांच्या छातीत अचानक इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं. सध्या त्यांना रुग्णालयात डाॅक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.माध्यमांच्या माहितीनुसार, प्रतिभाताई पाटील यांना गेल्या काही दिवसांपासूनच अस्वस्थ वाटू लागलं होतं. मात्र, काल अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तात्काळ पुण्यातील भारती हाॅस्पिटलमध्ये दाखल केलं.

प्रतिभाताई पाटील या 1991 साली अमरावतीमधून लोकसभा सदस्य झाल्या होत्या. त्यांनी, आरोग्य, पर्यटन, संसदीय कार्य, गृहनिर्माण, समाजकल्याण सांस्कृतिक, इतकेच नव्हे तर, सार्वजनिक आरोग्य समाजकल्याण, दारूबंदी पुनर्वसन, शिक्षणमंत्री अशा विविध खात्यांमध्ये मंत्री म्हणून आपली जबाबदारी पार पाडली. पुढे त्यांनी राज्यसभेच्या उपाध्यक्षा म्हणून म्हणूनही काम पाहिले. यानंतर त्या राष्ट्रपती झाल्यावर भारताच्या हितासंबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.

Pratibhatai Patil

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Pratibhatai Patil
Pratibhatai Patil

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Pratibhatai Patil
Share the Post:
error: Content is protected !!