ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Holi

Happy Holi 2024 Wishes in Marathi : महाराष्ट्रात 24 मार्चला होळी आणि 25 मार्चला धूलिवंदन साजरे केले जाणार आहे. रंगांचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय होय. लोक हा सण उत्साहात साजरा करतात. तुम्ही तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना, नातेवाईकांना आणि सहकाऱ्यांना शुभेच्छा देऊन हा सण साजरा करू शकता.

Holi Wishes in Marathi : महाराष्ट्रात 24 मार्चला होळी आणि 25 मार्चला धूलिवंदन साजरे केले जाणार आहे. वसंत ऋतूच्या आगमनाचा आनंद आणि हिवाळा संपल्याचा आनंद घेण्यासाठी हा सण साजरा केला जातो. रंगांचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय होय. लोक एकमेकांना वेगवेगळ्या रंगात रंगवतात आणि सण उत्साहात साजरा करतात. तुम्ही तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना, नातेवाईकांना आणि सहकाऱ्यांना होळीच्या शुभेच्छा (Holi wishes in marathi) देऊन हा सण साजरा करू शकता.

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये,
जळून जाऊ दे दु:खाचे सावट,
आयुष्यात येऊ दे सुखाचे क्षण..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

वाईटाचा होवो नाश,
आयुष्यात येवो सुखाची लाट..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..(Holi wishes in marathi)!

होळीच्या अग्नीत जळू दे दु:ख सारे,
तुमच्या आयुष्यात येऊ दे,
आनंदाचे क्षण सारे..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

होळीच्या शुभमुहुर्तावर येऊ दे,
तुमच्या आयुष्यात आनंद,
होऊ दे स्वप्नपूर्ती,
मिळू दे आनंदी आनंद..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

होळीच्या दिवशी करुन होलिका दहन,
संपवूया वाईट प्रवृत्ती
आणि आणूया आनंद..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

कालबाह्य गोष्टी मनातून काढा,
मनात पेटवा आशेची आग,
होळीकडे मागा हीच इच्छा,
पूर्ण होवो तुमच्या सर्व अपेक्षा..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…

टाकून द्या होळीत आयुष्याच्या अडचणी, चिंता, मनाचा गुंता..
करू होम दु:ख, अनारोग्याचा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

रंग नात्यांचा,
रंग बंधाचा,
रंग हर्षाचा,
रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा

भेटीलागी आले।
रंगांचे सोयरे।
म्हणती काय रे।
रंग तुझा।।
वदलो बा माझी ।
पाण्याचीच जात।
भेटल्या रंगात।
मिसळतो।।
होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा
– गुरू ठाकूर

होळी पेटू दे
रंग उधळू दे
द्वेष जळू दे
अवघ्या जीवनात
नवे रंग भरू दे !
होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

रंगात किती मिसळती रंग
जन उल्हासित होती दंग
होवो दुष्कृत्याचा भंग
होळी ठेवो देश एकसंग
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

भेदभाव हे विसरून सारे
दुःप्रवृत्तीचा अंत करा रे
जगण्यात या रंग भरा रे
हेच होळी गीत गात राहा रे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

बोंबा मारुनी केला शिमगा,
अरे, अमक्याच्या बैलाला, हो रू रू रू
तमक्याच्या बैलाला, हो रू रू रू
अनेकांचा होळीनिमित्त,
तिर्थ प्राशनाचाही कार्यक्रम झाला.
कारण, दुस-या दिवशी होती सुट्टी,
साजरी झाली होळी

लाल झाले पिवळे, हिरवे झाले निळे, कोरडे झाले ओले
एकदा रंग लागले तर सर्व होतात रंगीले
होळी/रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग,
व्हावे अवघे जीवन दंग,
असे उधळू आज हे रंग,
धुलिवंदन हार्दिक शुभेच्छा..(dhulivandan wishes in marathi)!

प्रेम, आनंद, सौहार्द आणि
विश्वासाच्या रंगात रंगते होळी
रंगीत होळी आणि धुलीवंदनाच्या
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू,
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

होळीच करायची तर
अहंकाराची, असत्याची, अन्यायाची,
जातीयतेची, धर्मवादाची,
हुंडा प्रथेची, भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची,
गर्वाची, दु:खाची होळी करा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

होळी, रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्यावेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आनंदाचा
होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा

नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

फाल्गुन मासी येते होळी
खायला मिळते पुरणाची पोळी
रात्री देतात जोरात आरोळी
राख लावतो आपुल्या कपाळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

धुळवडीचे रंग खेळताना पाण्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घेऊ.
कोरडे आणि नैसर्गिक रंग वापरुन या सणाचा आनंद द्विगुणित करू.
होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

Holi

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Holi
Holi

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Holi
Share the Post:
error: Content is protected !!