ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Shivneri

Shivneri : किल्ले शिवनेरीवर(Shivneri) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान, अचानक मधमाशांनी चावा घेतल्यानं घाबरलेल्या पर्यटकांमध्ये गोंधळ उडाला. काही पर्यटक पायऱ्यांवरून घसरून पडल्याने जखमी झाले.

Shivneri : किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान, शिवजयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडलीय. 84 पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला असून यात चार पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, किल्ले शिवनेरी परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना पाहून काही तरुणांनी मधमाशांच्या मोहोळावर दगड मारले होते. यामुळे उठलेल्या मधमाशांनी पर्यटकांवर जोरदार हल्ला केला.

अचानक मधमाशांनी चावा घेतल्यानं घाबरलेल्या पर्यटकांमध्ये गोंधळ उडाला. काही पर्यटक पायऱ्यांवरून घसरून पडल्याने जखमी झाले. शिवनेरी जवळच्या तुळजा लेणी पाहण्यासाठी हे पर्यटक आले होते. 84 पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. पुणे-मुंबई परिसरातील चिमुकल्यांसह महिला, नागरिक या मधमाशांच्या हल्ल्यात सापडले. मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर जुन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मधमाशांच्या मोहोळावर काही तरुणांनी दगड मारल्याची माहिती जखमी पर्यटकांनी दिलीय. पुरातत्व विभागाचा हलगर्जीपणा पर्यटकांना नडल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान हा प्रकार घडल्याने अनेक जण आरडाओरडा करत होते. त्यावेळी जुन्नर येथील क्रीडा शिक्षक सुनिल बढे यांनी जखमी झालेल्या पर्यटकांना अंगावर ओढणी, कपडे झाकून घेत बसण्यास सांगितले. तर लेणी परिसरात असलेल्या तुळजा मंदिरातील पुजाऱ्याची गादी त्यांनी बाहेर आणून पेटवली. या धुराने बहुतांश माशा निघून गेल्या. दरम्यान त्यांनीच जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य राजकुमार चव्हाण यांना ही घटना कळवली. त्यांनी लगेचच ग्रामीण रुग्णालयाला संपर्क साधून १०८ ॲम्बुलन्स आणि आणखी एक ॲम्बुलन्स तातडीने बोलावून जखमींना रुग्णालयात हलवले.

Shivneri
Shivneri

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Shivneri
Shivneri

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Shivneri
Share the Post:
error: Content is protected !!