ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Horoscope Today

Horoscope Today : बुधवार २० मार्च २०२४

Horoscope Today 20 March 2024 : पंचांगानुसार, आज 20 मार्च 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. आज तुमच्यावर एखादी मोठी जबाबदारी येऊ शकते. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा बुधवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) – नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, नोकरी, ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला आज खूप मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचं वागणं तु्म्हाला भोवू शकतं, वेळेत सुधारणा करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

व्यवसाय (Business) – व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, बांधकाम साहित्याचा व्यवसाय करणाऱ्यांनी विचार न करता गुंतवणूक करू नये, तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.

विद्यार्थी (Student) – विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झाल्यास, आज तुम्ही मानसिक तणावात राहाल. पालकांशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. एखादी खास व्यक्ती, जसे की प्रियकर किंवा मित्र काही काळासाठी तुमच्यापासून दूर जाऊ शकतो.

आरोग्य (Health) – तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आरोग्याबाबत सावध राहा. ताप, सर्दीसारखे आजार होतील. डोकेदुखी जाणवू शकते.

वृषभ(Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) – नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, नोकरदारांनी कामात मेहनतीवर विश्वास ठेवा आणि तुमचं काम करत राहा. परिस्थितीतील चढ-उतारांना तोंड देण्यासाठी आत्मविश्वास बाळगला पाहिजे.

व्यवसाय (Business) – व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन कल्पनांचा विचार कराल आणि चांगलं यश मिळवाल. व्यापाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल.

विद्यार्थी (Student) – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल राहील. विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडू वेळ आल्यावर स्वतःला अधिक चांगल्या पद्धतीने सिद्ध करू शकतील. 

आरोग्य (Health) – तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, आरोग्याची काळजी घ्या आणि प्राणायाम करा. तणाव घालण्यासाठी लहान मुलांसोबत वेळ घालवा. तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवल्याने देखील तुमचा ताण कमी होईल.

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) – आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या नोकरीत यश मिळवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत केली पाहिजे, तरच तुम्हाला यश मिळेल आणि तुमचा पगारही वाढू शकेल. आज तुम्ही शॉर्टकट मारणं टाळा, अन्यथा तुमचं काही नुकसान होऊ शकतं.

व्यवसाय (Business) – व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल. व्यावसायिकांनी नियमांचं पालन करुन काम करावं, सर्व कायदे लक्षात घेऊन व्यवसाय वाढवावा.

विद्यार्थी (Student) – आज तुम्हाला एकटं वाटू शकतं, तुम्हाला एकटेपणा जाणवू नये म्हणून आज तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आरोग्य (Health) – तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा एक छोटीशी चूक देखील तुम्हाला महागात पडू शकते.

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) – आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, नोकरीच्या शोधात असलेले लोक नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्यात सकारात्मक ऊर्जा असेल.

व्यवसाय (Business) – जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, व्यवसायात चांगले परिणाम मिळविण्यासाठी काही अतिरिक्त प्रयत्न करण्याचा हा दिवस आहे. प्रत्येक काम तुम्ही सहज करू शकाल. व्यवसायात वाढ होईल.

विद्यार्थी (Student) – आज तुमच्या स्वभावात काही बदल होऊ शकतात, जे तुम्हाला नवीन प्रगतीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात.

आरोग्य (Health) – तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सावध राहावं. बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होईल.

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) – आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, कामावर चुकीची कामं करणं टाळा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा. जे लोक महत्त्वाचा डेटा हाताळतात त्यांना आज काळजी घ्यावी लागेल, तुम्हाला तुमचा सर्व डेटा सुरक्षितपणे ठेवावा लागेल. तुम्ही नोकरीत काही अडचणी आल्यास त्वरित वरिष्ठांशी बोला.

व्यवसाय (Business) – व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, योग्य विचार करूनच गुंतवणूक करा. व्यवसायिकांनी गरजेनुसारच माल साठवावा, कारण वातावरणातील बदलामुळे माल खराब होण्याची शक्यता असते.

विद्यार्थी (Student) – विद्यार्थ्यांसाठी दिवस अडचणींचा असेल. आरोग्याच्या कारणास्तव कोणत्याही प्रकारचा प्रवास करू नका. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच प्रवास करा आणि तेही सावधगिरीने.

आरोग्य (Health) – तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज संधिरोगाशी संबंधित आजारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही रात्री उशिरा जेऊ नये, अन्यथा तुमचं पोट खराब होऊ शकतं आणि तुमचा त्रास आणखी वाढू शकतो.

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) – आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, नेतृत्व कौशल्य तुम्हाला तुमच्या नोकरीत खूप पुढे घेऊन जाईल. कामाच्या ठिकाणी सहकारी विनाकारण  पंगा घेण्याचा प्रयत्न करत असतील, तर तुम्ही बळाच्या ऐवजी बुद्धिचा वापर करून त्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

व्यवसाय (Business) – व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, बुधादित्य योग तयार झाल्याने प्रॉपर्टी डीलिंगमध्ये काम करणाऱ्यांसाठी दिवस चांगला जाईल. अचानक लाभ मिळाल्याने तुमच्या आनंदाला सीमा उरणार नाही.

विद्यार्थी (Student) – तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. कुटुंबातील प्रत्येकाचे ऐका आणि त्यांच्यासोबत वेळ घालवा. विद्यार्थ्यांना भविष्यातील नियोजनात कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. 

आरोग्य (Health) – तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, पचनाच्या समस्या असू शकतात. तुमच्या खाण्याच्या सवयींची काळजी घ्या.

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) – आजचा दिवस थोडा त्रासदायक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, काम करणाऱ्या व्यक्तीला इतर दिवसांपेक्षा जास्त काम करावं लागू शकतं, म्हणून स्वतःला अधिक परिश्रमासाठी तयार करा.

व्यवसाय (Business) – व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, जर व्यावसायिकांचं एखादं काम ठप्प झालं असेल तर ते खूप चिंतेत असतील. परंतु थोडे हात-पाय हलवले तर तुमचं काम पुन्हा सुरू होऊ शकतं, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.

विद्यार्थी (Student) – आज एखाद्याला असं कोणतंही वचन देऊ नका, जे तुम्ही पूर्ण करू शकणार नाही, नाहीतर तुमच्या वचनामुळे सगळे तुमच्यावर हसतील.

आरोग्य (Health) – तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, हृदयरोगींना स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. योग्य आहार घ्या आणि औषधं नियमित घ्या.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) – आजचा दिवस संमिश्र राहील. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे निभावाल, कारण काम चुकलं तर तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर नाराज होऊ शकतात आणि तुमचे विरोधक याचा फायदा घेऊ शकतात. 

व्यवसाय (Business) – व्यावसायिकांसाठी काळ चांगला आहे, कामात नवीन संधी निर्माण होतील आणि तुमचं नियोजनही यशस्वी होईल. भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्या भागीदारांमध्ये पारदर्शकता आणि स्पष्टता ठेवावी.

विद्यार्थी (Student) – विद्यार्थ्यांना आपलं करिअर घडवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, तरच ते यश मिळवू शकतात. 

आरोग्य (Health) – आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलचा त्रास असलेल्यांनी त्यांच्या डाएट चार्टमधून चरबीयुक्त पदार्थ काढून टाकावेत

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) – आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, कामाच्या ठिकाणी धावपळ करण्याऐवजी स्मार्ट वर्कवर लक्ष केंद्रित करा. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला क्षणिक रागाच्या सवयीवर नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा ते करिअर आणि उत्पन्नासाठी हानिकारक ठरू शकतं.

व्यवसाय (Business) – व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यवसायातील कोणतंही काम पुढे ढकलत राहिल्यास ते भविष्यात तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. कर्मचाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास ते चांगलं काम करतील आणि तुमचा व्यवसाय नफ्यात राहील.

विद्यार्थी (Student) – तुम्ही अभ्यासात जास्त लक्ष दिलं पाहिजे. तुमच्या मनात काही नवीन कल्पना येऊ शकतात, ज्यामुळे तुमचं करिअर अधिक चांगलं होऊ शकतं, नवीन कल्पना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.

आरोग्य (Health) – तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्हाला शारीरिक समस्यांमुळे त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका, अन्यथा तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्ही खूप चिंतेत असाल.

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) – आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, नोकरीत तुमची प्रलंबित कामं पूर्ण करण्यावर भर द्यावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला काही जबाबदारी मिळू शकते. 

व्यवसाय (Business) – व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या व्यवसायात यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.

विद्यार्थी (Student) – तरुणांनी आज प्रतिकूल परिस्थितीसाठी स्वतःला तयार केलं पाहिजे, कारण जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार होत नाही. तुमच्या सभ्यतेचा आणि तुमच्या चांगल्या वागणुकीचा कोणीही फायदा घेऊ शकतं.

आरोग्य (Health) – तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. तणावपूर्ण गोष्टींपासून दूर राहा, अन्यथा तुमची डोकेदुखी वाढू शकते. कोणत्याही प्रकारच्या तणावापासून दूर राहा. 

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) – नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस ऑफिसमध्ये तुमच्यासाठी अनुकूल असेल, नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध अधिक घट्ट होतील, ते तुमच्यावर खूश असतील आणि तुमचा पगार वाढवतील.

व्यवसाय (Business) – व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल. प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा काळ चांगला असेल. आज तुम्ही जी कोणती डील कराल त्यात तुम्हाला नक्कीच चांगला नफा मिळू शकेल, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल.

कौटुंबिक (Family) – जर तुम्ही कुटुंबात मोठे असाल तर कुटुंबातील लहानांना अवैध कामांपासून दूर राहण्याचा सल्ला देणं तुमचं कर्तव्य आहे.

आरोग्य (Health) – तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. आज तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) – जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुमचे ज्युनिअर आणि सिनीअर तुम्हाला कामात मदत करतील, आज तुमचं मन कामात गुंतलेलं असेल.

व्यवसाय (Business) – व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, शोभन योग, बुधादित्य योग तयार झाल्यामुळे व्यवसायात लाभ होईल. व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे.

विद्यार्थी (Student) – विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, सीएस आणि आयटीच्या विद्यार्थ्यांनी महत्त्वाची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचं नियोजन करावं.

आरोग्य (Health) – तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.

Horoscope
Horoscope

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Horoscope
Horoscope

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Horoscope
Share the Post:
error: Content is protected !!