ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Horoscope Today

Horoscope Today : शनिवार २४ फेब्रुवारी २०२४

Horoscope Today 24 February 2024 : आजचा दिवस, शनिवार, 24 फेब्रुवारी 2024, काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम घेऊन येऊ शकतो. 12 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी खास असणार आहे. सर्व राशीच्या लोकांसाठी शनिवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) – आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल सांगायचं तर, नोकरीत काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही घेत असलेली मेहनत पाहून तुमचे बॉस तुमच्यावर खुश होतील. आज सहकारी देखील तुम्हाला कामात मदत करतील, तुमचा त्यांच्याशी चांगला संवाद होईल.

व्यवसाय (Business) – व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमचा आजचा दिवस ठिक-ठाक असेल. तुम्ही रोजच्या व्यवहाराच्या नोंदी ठेवाव्या, तरच तुम्हाला नफा-तोट्याचा अंदाज येईल. तुम्ही सर्व व्यवहार नोंद करुन ठेवण्याची सवय लावा. 

विद्यार्थी (Student) – आज तुम्ही बोलण्यात नम्र असावं, तरच तुमची कामं पूर्ण होऊ शकतात. तुमच्या बोलण्यात कटूता येऊ देऊ नका, तरच तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकाल. 

आरोग्य (Health) – तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, जर तुम्हाला बीपीचा त्रास असेल तर आज तुम्ही आरोग्याची काळजी घ्यावी. आज तुमचा बीपी हाय होऊ शकतो. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचं आरोग्य देखील आज बिघडू शकतं.

वृषभ(Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) – नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही कामाच्या ठिकाणी अपूर्ण राहिलेली कामं आधी पूर्ण करुन घ्यावी. आज तुम्ही कामात सहकाऱ्यांची मदत घेऊ शकता.

व्यवसाय (Business) – व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमचा आजचा दिवस चांगला असेल. आज व्यवसायात तुम्ही प्रगती कराल, तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

विद्यार्थी (Student) – आज तुमचं अभ्यासात जास्त लक्ष लागेल. तुमचा अभ्यास चांगला होईल. मुलांनी वाईट संगतीपासून लांब राहावं, अन्यथा तुमचं करिअर धोक्यात येऊ शकतं.

कौटुंबिक (Family) – तुम्ही तुमच्या कुटुंबाला अधिक वेळ दिला पाहिजे. तुमच्या जोडीदाराचं तुम्हाला सहकार्य लाभेल. तुमच्या मुलांमुळे तुमचा दिवस आनंदी राहील.

आरोग्य (Health) – आरोग्याविषयी बोलायचं झाल्यास, जर तुम्ही एखादी औषधं घेत असाल तर ती वेळेवर घेत राहा. औषधं घेण्यास उशीर केल्यास तुमच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होईल.

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) – तुमचा आजचा दिवस थोडा कठीण जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज नोकरीत तुम्हाला आव्हानात्मक काम मिळू शकतं, जे पूर्ण करण्यात तुम्हाला थोड्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही यशस्वीपणे तुमचं काम संपवाल. 

व्यवसाय (Business) – व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांना आज आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एखाद्या गुंतवणुकदाराकडून तुम्हाला मदत मिळू शकते किंवा तुम्ही कर्जही घेऊ शकता. 

विद्यार्थी (Student) – तुम्ही वाईट संगतीतील मित्रांच्या सहवासात वेळ घालवू नये. तुम्ही चुकीच्या मार्गावरही जाऊ शकता.

आरोग्य (Health) – तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्ही दारुचं व्यसन करू नये. तुम्हाला दारू पिण्याची सवय असेल तर ती सोडून द्यावी, अन्यथा तुम्हाला यकृताशी संंबंधित आजार उद्भवू शकतात.

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) – नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, आजचा तुमचा दिवस चांगला जाईल. आज तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. आज तुमची एखाद्या अशा विभागात बदली होईल, जिथे तुम्हाला वाढीव पगार मिळेल.

व्यवसाय (Business) – जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, तुम्हाला व्यवसायातून अपेक्षित नफा मिळत नसेल तर थोडा धीर धरावा. व्यवसायाचं स्वरुप बदलून पाहावं, कदाचित तुमचा व्यवसाय चांगला सुरू होऊ शकतो.

विद्यार्थी (Student) – विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या भविष्याचा विचार करुन तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील. तुम्ही आताच योग्य करिअरचा विचार केला तर तुमचं भविष्य उज्वल होईल. 

आरोग्य (Health) – तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. डोळ्यांशी संबंधित त्रास, डोळ्यांची जळजळ तुम्हाला जाणवू शकते. आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रासही जाणवू शकतो. 

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) – नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, आज ऑफिसमध्ये तुमचा दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत लाभेल, वरिष्ठ तुम्हाला एखाद्या कामाची जबाबदारी सोपावू शकतात.

व्यवसाय (Business) – व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी तुमच्या उत्पादनांच्या जाहिरातीकडे खूप लक्ष द्यावं लागेल. 

विद्यार्थी (Student) – जर एखादा जवळचा मित्र तुमच्यावर नाराज असेल तर त्याची समजूत घालावी, मैत्रीतील तणाव दूर करावे.

आरोग्य (Health) – तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्ही आरोग्याची चांगली काळजी घ्यावी. छोटे-छोटे आजार देखील पुढे जाऊन गंभीर समस्येचं रुप धारण करू शकतात.

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) – जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आजचा दिवस शानदार असणार आहे. मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज अद्भूत संधी प्राप्त होऊ शकतात. तुमची वाटचाल यशाकडे होत आहे, हे तुम्ही लक्षात घ्यावं.

व्यवसाय (Business) – व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यवसायिकांनी आज वायफळ खर्च करु नये, अन्यथा तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर आज तुम्हाला नफा मिळेल.

विद्यार्थी (Student) – तरुण मंडळी आज मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकतात, परंतु या दरम्यान तुम्ही कोणत्याही नियमांचं उल्लंघन करु नये, अन्यथा तुम्हाला ते महागात पडू शकतं.

आरोग्य (Health) – तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, खाण्याशी संबंधित गोष्टींची थोडी काळजी घ्यावी. सकस आहार घ्यावा. तुम्ही एखाद्या लग्नकार्यात सहभागी होऊ शकता, जिथे जाऊन तुमचं मन प्रसन्न होईल.

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) – तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही हाती घेतेलेले काम यशस्वीरीत्या पूर्ण कराल. कार्यालयातील एखादे रखडलेले काम लवकरच पूर्ण होईल.उद्या हाती घेतलेले प्रत्येक काम वेळेत पूर्ण होईल

व्यवसाय (Business) – व्यवसायात कोणताही निर्णय घेताना आपल्या जोडीदाराशी चर्चा करा. आपल्या जोडीदाराला गृहीत धरून निर्णय घेतल्याने जोडीदार नाराज होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे लावणार असाल तर आज तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज नातेवाईक मदत मागण्याची शक्यता आहे.

आरोग्य (Health) – आरोग्याची काळजी घ्या. पाय दुखणे वाढण्याची शक्यता आहे. जास्त पाय दुखल्यास तेलाने मसाज करा. मसाज केल्याज पायाला आराम मिळेल. आळस झटका. आळशीपणाने तुमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) – वृश्चिक राशीचा आजचा दिवस संमिश्र असणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींचा आजचा दिवस तणावात जाईल. ऑफिसच्या कामावर लक्ष द्या. तरच तुमचे काम वेळेत पूर्ण होईल

व्यवसाय (Business) – व्यवसायात आज यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांनी आपल्या व्यवसायात लक्ष घालावे. व्यवसायिकांनी कोणतीही गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. अनुभवी व्यक्तींशी चर्चा करा. सकरात्मक घटनामुळे मन प्रसन्न होईल. आपल्या वडिलांशी चर्चा करा. ते तुमच्या समस्या दूर करण्यास मदत करतील. 

आरोग्य (Health) – आज तुम्हाला बरं वाटेल. जर आरोग्याविषयी बोलायचे तर तुम्हाला कोलेस्ट्राॉलची समस्या असेल तर आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवा. छोट्या मोठ्या आरोग्याच्या समस्या उद्भवतील. डॉक्टरांचा सल्ला घ्या.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) – धनु राशीचा आजचा दिवस प्रचंड व्यापाचा असणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आज नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. ती तुम्ही व्यवस्थीतपणे पार पाडाल.

व्यवसाय (Business) – व्यसाय करणाऱ्यांविषयी बोलायचे तर तर तुम्ही एखाद्या नव्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करणार असाल विचार करा. त्या प्रोजेक्टची चौकशी करा आणि नंतर गुंतवणूक करा.  नुकसान होण्याची शक्यता आहे. कुंटुबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

आरोग्य (Health) – जर तुमची तब्येत बरी नसेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या आजार छोटा किंवा मोठा असला तरी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डोकेदुखीची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) – आजचा दिवस थोडा तणावाचा असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आज ऑफिसमधील कटकारास्थांना सामोरा जावे लागेल, त्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. 

व्यवसाय (Business) – व्यवसायिकांना आज व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. परंतु दिवसाच्या शेवट काही कारणांनी चिंतेत असेल.आज तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना मदत कराल. त्यामुळे तुमचे सहकारी तुमचे कौतुक कराल.

आरोग्य (Health) – जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्हाला विशेष काळजी घेण्याची गरज आहे. दुर्लक्ष केल्याने आज तुमची तब्येत खराब होईल. त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) – कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला असणार आहे. आज ऑफिसमध्ये जास्त कामाचा व्याप असेल.अचानक काम आल्याने बाहेरगावी जाण्याचा योग येईल. वरिष्ठ तुमच्या कामामुळे तुमच्यावर खूश होतील.

व्यवसाय (Business) – व्यवसाय करणााऱ्यांसाठ आजचा दिवस संमिश्र लाभाचा असणार आहे. छोटे- मोठे लाभ होतील. आज तुमचा अनावश्यक खर्च होईल. तुमचे एखाद्या प्रॉपर्टी संदर्भात कोणते वाद असतील तर ते लवकरच सुटतील. सर्व गोष्टीचा हिशोब ठेवा.

आरोग्य (Health) – आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर, आज तुम्ही डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी, डोळ्यांशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज तुम्ही कोणत्याही वादात पडू नका. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) – तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या बॉसच्या मदतीने एखादं कठीण काम पूर्णत्वास नेऊ शकता.

व्यवसाय (Business) – व्यावसायिकांनी व्यवसायाशी संबंधित सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी, कायदेशीर कारवाई टाळायची असल्यास सर्व कागदपत्र तयार ठेवा, जेणेकरुन तुमच्या प्रतिमेला कधी धक्का बसणार नाही. तरुणांचा आजचा दिवस चांगला जाईल, त्यांच्या इच्छा आज पूर्ण होतील.

आरोग्य (Health) – आज तुम्ही कोणत्याही वादात पडू नका. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. ताप, सर्दी, खोकल्यासारखे आजार तुम्हाला होऊ शकतात.  आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही आहारात दूध, कडधान्यांचा वापर करावा.

Horoscope Today
Horoscope Today

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Horoscope Today
Horoscope Today

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Horoscope Today
Share the Post:
error: Content is protected !!