ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Horoscope Today

Horoscope Today : रविवार २४ मार्च २०२४

Horoscope Today 24 March 2024 : पंचांगानुसार, आज 24 मार्च 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. आज होळीच्या दिवशी काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा देखील येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा रविवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) – आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, नोकरी, ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी तुमचं खूप कौतुक होईल. तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. घरापासून दूर काम करणारे लोक त्यांच्या कुटुंबाला मिस करू शकतात, ज्यामुळे त्यांचं मन थोडं विचलित होऊ शकतं, ते शक्य तितक्या लवकर त्यांच्या कुटुंबाला भेटण्याचा प्रयत्न करू शकतात.

व्यवसाय (Business) – व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठीही चांगला असेल. तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित काही योजना बनवू शकता, तुमची ती योजना यशस्वी देखील होऊ शकते. 

विद्यार्थी (Student) – विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झाल्यास, आज तुम्ही तितका अभ्यास करणार नाही. जे लोक लव्ह लाईफमध्ये आहेत, ते प्रियकरासोबत चांगले क्षण घालवतील.

आरोग्य (Health) – तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, कामाच्या बिझी शेड्युलमुळे तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकणार नाही, परंतु यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. तुमच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या, तुम्ही होळीचा सण पूर्ण उत्साहात साजरा कराल. 

वृषभ(Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) – नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमच्या कामाच्या ठिकाणी काही अडथळ्यामुळे काम थांबेल, ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होऊ शकतं.

व्यवसाय (Business) – व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या व्यवसायात चांगलं काम कराल, तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील. तुमचा व्यवसाय चांगला चालेल, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल.

विद्यार्थी (Student) – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल राहील. शाळेला सुट्टी असल्याने मौजमजा करण्यात तुम्ही दिवस घालवाल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत होळीच्या तयारीत व्यस्त असाल. तुम्ही तुमचा सण उत्साहात साजरा कराल.

आरोग्य (Health) – तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, तुमचं आरोग्य चांगलं राहील, परंतु बाहेरील कोणत्याही प्रकारचं अन्न खाणं टाळावं, अन्यथा तुमची प्रकृती बिघडू शकते आणि तुम्हाला पोटदुखीचा त्रासही होऊ शकतो.

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) – आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, जे लोक रोजगाराच्या शोधात असतील तर आज त्यांना रोजगाराशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते, त्यांना चांगली नोकरी मिळू शकते, जिथे त्यांना त्यांच्या पहिल्या नोकरीपेक्षा जास्त पगार मिळेल.

व्यवसाय (Business) – व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, जर तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला भविष्यात त्या योजनेचा लाभ मिळू शकेल. तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होऊ शकते. परंतु तुम्ही तुमचे पैसे हुशारीने खर्च करावे, अन्यथा काही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थी (Student) – तरुणांनी आज आपल्या अंगातील आळस दूर करण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा तुमच्या आळसामुळे तुमचं काही महत्त्वाचं आणि अत्यावश्यक काम बिघडू शकतं. आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा.  

आरोग्य (Health) – तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं राहील, त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा कमी वाटेल. हळूहळू तुमची प्रकृती सुधारेल, फक्त तुमची औषधं वेळेवर घेत राहा. होळी सणाचा आनंद घ्या.

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) – आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमचे विरोधक तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात, परंतु तुम्ही त्यातून सुटू शकता आणि तुमचा विरोधक स्वतः त्या कटात अडकू शकतो.

व्यवसाय (Business) – जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोठी संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमचा व्यवसाय अधिक चांगला होईल आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. आज तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही वाद तुम्हाला त्रास देऊ शकतात, पण त्यावर लवकरच उपाय सापडतील.

विद्यार्थी (Student) – तरुण आपल्या कौशल्याने काही मोठं काम करून यश मिळवू शकतात, त्यात तुमची आर्थिक स्थितीही मजबूत असेल.

आरोग्य (Health) – जर तुम्ही खूप दिवसांपासून मानसिक तणावातून जात असाल तर आज हा ताण कमी होऊ शकतो. तुम्ही तुमची औषधं वेळेवर घेत राहा, अन्यथा जुने आजार तुम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतात. आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये संतुलन ठेवा आणि शक्य तितका पौष्टिक आहार घ्या. 

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) – आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, कामावर चुकीची कामं करणं टाळा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा. जर तुम्हाला तुमच्या नोकरीसोबत काही पार्ट टाईम जॉब करायचा असेल तर त्यातही तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते.

व्यवसाय (Business) – व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठीही चढ-उताराचा असू शकतो. तुम्ही तुमच्या व्यवसायात जास्त पैसे गुंतवू नये, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.

विद्यार्थी (Student) – विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. परंतु आयुष्यात यश मिळवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत कराल, परंतु तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार फळ मिळणार नाही.

आरोग्य (Health) – तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमचं आरोग्य चांगले राहील. जर तुमचे जुने आजार तुम्हाला त्रास देत असतील तर तपासणी करून घ्या, तुमचा आजार वाढू शकतो, त्यावर उपचार घेतल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल. तुमच्या तब्येतीमुळे तुमचा होळीचा सण थोडासा निराशेचा होऊ शकतो. 

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) – आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुमच्या ऑफिसमधील तुमच्या कामाची कार्यक्षमता पाहून तुमचे अधिकारी तुमच्यावर खूप खुश होतील.  

व्यवसाय (Business) – व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला व्यवसायाच्या बाबतीत तुमच्या वडिलांचा किंवा भावाचा सल्ला घ्यावा लागेल, तरच तुमच्या व्यवसायात प्रगती होईल. तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित काही नवीन काम देखील सुरू करू शकता, यामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो.

विद्यार्थी (Student) – तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. आज तुम्ही मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन आखू शकता, जिथे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत खूप मजा कराल.

आरोग्य (Health) – तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमची तब्येत ठीक राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. प्रवासामुळे थकवा जाणवू शकतो. आज तुम्ही होळीच्या सणात व्यस्त असाल, कामाच्या दरम्यान तुम्ही विश्रांती घेतल्यास चांगलं होईल. 

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) – आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला ऑफिसच्या कामाच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास तुमच्या नोकरीसाठी खूप फायदेशीर ठरेल.

व्यवसाय (Business) – व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, जर व्यावसायिकांचं एखादं काम ठप्प झालं असेल तर ते खूप चिंतेत असतील. परंतु थोडे हात-पाय हलवले तर तुमचं काम पुन्हा सुरू होऊ शकतं, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.

विद्यार्थी (Student) – आज तुम्हाला काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यात तुम्ही उत्साहाने सहभागी व्हाल. होळीच्या सणादरम्यान तुमच्या काही जुन्या आठवणी तुमच्या मनाला त्रास देऊ शकतात.

आरोग्य (Health) – तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमची तब्येत बिघडू शकते. तब्येत बिघडल्यामुळे तुमचा स्वभाव खूप चिडचिडा होईल, यामुळे तुमचे कुटुंबीय तुमच्यावर रागवतील.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) – आजचा दिवस तुमच्यासाठी काही सकारात्मक परिणाम घेऊन येईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमच्या ऑफिसच्या कामात चांगला वेळ जाईल. काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, तुम्ही तुमच्या डोक्याने या समस्या सोडवू शकता.

व्यवसाय (Business) – आज व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित काही अडकलेले पैसे मिळू शकतात, ज्यामुळे तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.

विद्यार्थी (Student) – विद्यार्थ्यांना आपलं करिअर घडवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, तरच ते यश मिळवू शकतात. आज तुमचे मित्र वाढतील, नवीन भेटी होतील. 

आरोग्य (Health) – आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलचा त्रास असलेल्यांनी त्यांच्या डाएट चार्टमधून चरबीयुक्त पदार्थ काढून टाकावेत

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) – आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, कामाच्या ठिकाणी धावपळ करण्याऐवजी स्मार्ट वर्कवर लक्ष केंद्रित करा. तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खूप खुश होतील, ते तुमचा पगार देखील वाढवू शकतात.  

व्यवसाय (Business) – व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यवसायातील कोणतंही काम पुढे ढकलत राहिल्यास ते भविष्यात तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. होळीच्या निमित्ताने तुमचा व्यवसाय चांगला होईल, तुम्ही चांगला नफा कमवाल.

विद्यार्थी (Student) – तुम्ही अभ्यासात जास्त लक्ष दिलं पाहिजे. तुमच्या मनात काही नवीन कल्पना येऊ शकतात, ज्यामुळे तुमचं करिअर अधिक चांगलं होऊ शकतं, नवीन कल्पना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.

आरोग्य (Health) – तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही. तुम्ही मोठ्या थाटामाटात होळीची तयारी कराल. 

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) – आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या कामात काही अडथळे येत असतील तर हे अडथळे आणखी काही काळ चालू राहतील, त्यानंतर सर्व काही ठीक होईल.

व्यवसाय (Business) – व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, जर तुम्हाला भागीदारीत कोणताही व्यवसाय करायचा असेल तर आता करू नका, अन्यथा, तुमचा भागीदार तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि तुम्ही त्यात अडकू शकता.

विद्यार्थी (Student) – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तरुणांनी जीवनात यश मिळवण्यासाठी सतत मेहनत करत राहावं, त्यांना यश नक्की मिळेल.

आरोग्य (Health) – तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आज पोटाशी संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच औषधं घ्या. आरोग्याबाबत अजिबात निष्काळजी राहू नका.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) – नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस ऑफिसमध्ये तुमच्यासाठी अनुकूल असेल, नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध अधिक घट्ट होतील, ते तुमच्यावर खूश असतील आणि तुमचा पगार वाढवतील.

व्यवसाय (Business) – व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यवसाय क्षेत्राशी संबंधित लोकांना आज नफा मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती देखील खूप मजबूत होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही.

कौटुंबिक (Family) – आज तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात संतुलन राखले पाहिजे, अन्यथा तुमच्या कुटुंबातील कोणाशी तरी वाद होऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दल काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा.

आरोग्य (Health) – तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती घ्या. आज तुम्ही होळीसाठी गुलाल खरेदी करू शकता. 

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) – आजचा दिवस थोडा चढ-उताराचा राहील. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, कोणतेही काम घाईत करू नका, अन्यथा तुमचे घाईचे काम तुमची डोकेदुखी बनू शकते.

व्यवसाय (Business) – व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस तुमच्यासाठी पैशाच्या बाबतीत काही चढ-उतार घेऊन येईल, त्यामुळे विचार न करता कोणाशीही पैशाशी संबंधित व्यवहार न केल्यास चांगलं होईल, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात.

विद्यार्थी (Student) – विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, सीएस आणि आयटीच्या विद्यार्थ्यांनी महत्त्वाची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचं नियोजन करावं.

आरोग्य (Health) – तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते

Horoscope
Horoscope

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Horoscope
Horoscope

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Horoscope
Share the Post:
error: Content is protected !!