ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Horoscope Today

Horoscope Today : गुरुवार २८ मार्च २०२४

Horoscope Today 28 March 2024 : पंचांगानुसार, आज 28 मार्च 2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. आजच्या दिवशी काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा देखील येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा गुरुवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) – आजचा दिवस आव्हानात्मक असू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, ऑफिसमध्ये आज तुमचं कोणतंही काम सहजासहजी पूर्ण होणार नाही, आज तुम्हाला काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.

व्यवसाय (Business) – व्यावसायिकांनी व्यवसायात थोडं सावध असलं पाहिजे. तुम्ही पैसे घेताना आणि देताना थोडं सावध असलं पाहिजे, पैशांचा व्यवहार करताना दोनदा तपासून पाहावं, अन्यथा तुमचं नुकसान देखील होऊ शकतं.

विद्यार्थी (Student) – विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झाल्यास, आज तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीची काळजी सतावेल. कोणाचं ऐकावं आणि कोणाचं ऐकू नये, हे समजणार नाही. आज तुम्ही मानसिक आणि भावनिकदृष्ट्या गोंधळलेले दिसाल.  

आरोग्य (Health) – तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला जास्त कामामुळे थकवा जाणवू शकतो, तुम्हाला अशक्तपणाही जाणवू शकतो. म्हणूनच कामाच्या मधे तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींकडं विशेष लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात फळांचा समावेश केल्यास चांगलं होईल. 

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) – नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. आज तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होऊ शकतं, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल.

व्यवसाय (Business) – जे लोक त्यांचं घर, जमीन किंवा वस्तू भाड्याने देतात, त्यांच्यासाठी ते उत्पन्न हा एक चांगला पैशांचा स्त्रोत बनू शकतो. तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता.

विद्यार्थी (Student) – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुमच्या इच्छा आज पूर्ण होतील, अभ्यासात मन लागेल. आज तुम्ही तुमच्या प्रियकारासोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता.

आरोग्य (Health) – तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीकोनातून सामान्य असेल. आज तुम्हाला जास्त उत्साही वाटेल. तुमचं शरीर पूर्णपणे तंदुरुस्त राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही.

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) – नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, काल तुमच्या कामाबाबत ज्या काही तक्रारी केल्या जात होत्या, त्या आज दूर होतील. आज ऑफिसच्या कामात तुमचं मन गुंतलेलं असेल, त्यामुळे तुमचे अधिकारी तुमच्यावर खूश असतील.

व्यवसाय (Business) – व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, जर व्यावसायिक लोक कोणतीही मालमत्ता विकण्याचा किंवा खरेदी करण्याचा किंवा भाड्याने देण्याचा विचार करत असतील तर आजचा दिवस चांगला असेल.

विद्यार्थी (Student) – आज तुम्ही आईवडिलांची सेवा कराल. तुमच्या कुटुंबात शांततेचं वातावरण राहील.

आरोग्य (Health) – तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, जर तुम्ही पाय आणि सांधेदुखीने त्रस्त असाल तर तुम्हाला थोडा आराम मिळू शकतो. तुम्ही तेल लावून थोडी मालिश करा, यामुळे तुम्हाला वेदनांपासून आराम मिळेल. 

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) – आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या कामावर काही लोक त्रास देऊ शकतात, तुम्ही मॅनेजरकडे त्याची तक्रार करू शकता.

व्यवसाय (Business) – आज व्यापारी वर्गाने आपल्या व्यवसायात थोडं सावध राहावं, तरच तुम्ही तोट्यापासून वाचू शकाल. तुम्हाला प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकावं लागेल.

विद्यार्थी (Student) – तरुणांना त्यांच्य स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडावं लागेल. तुमची स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागेल, तरच तुम्ही यश मिळवू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर गेलात तर अपेक्षेपेक्षा जास्त पैसे खर्च होऊ शकतात, म्हणूनच तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड अतिशय विचारपूर्वक वापरल्यास चांगलं होईल.

आरोग्य (Health) – आज तुम्ही तुमच्या आरोग्याची थोडी काळजी घेतली पाहिजे आणि जर तुमचं वजन वाढत असेल तर तुम्ही तुमचं वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा, नियमित व्यायाम करा. तुमचं वजन खूप कमी किंवा जास्त नसावं, याची काळजी घ्या. आज तुम्हाला गुडघेदुखीची समस्या सतावू शकते.

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) – जर तुम्ही आज ऑफिसमध्ये एखादं काम चुकवलं तर उत्तर देण्यास तयार राहा, कारण तुमचा बॉस तुम्हाला आज केलेल्या सर्व कामाबद्दल विचारू शकतो. सर्व कामं वेळेवर पूर्ण न केल्यामुळे तुम्हाला ओरडा पडू शकतो.

व्यवसाय (Business) – व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज व्यापारी वर्गाने सरकारी नियमांचे उल्लंघन करू नये, कारण यावेळी तुम्ही काही चूक केली तर तुमच्यावर सरकारी कारवाई होऊ शकते.

विद्यार्थी (Student) – तरुणांनी आज अति विचार करू नये, नाहीतर तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो.

आरोग्य (Health) – तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, कामाच्या बिझी शेड्युलमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे तुमची एनर्जी लेव्हल कमी झालेली दिसू शकते. तुम्ही विश्रांती घेतली पाहिजे, तरच तुम्हाला निरोगी आणि उत्साही वाटेल.

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) – आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, जे सेल्स अँड मार्केटिंगमध्ये काम करतात, ते आज चांगलं कलेक्शन करू शकतील. आज नोकरदार स्वतःच्या कामावर खूप खुश असतील. तुमचं काम आज अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकेल.

व्यवसाय (Business) – व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, जर तुम्ही तुमच्या व्यवसायात संयमाने काम करत राहिलात तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत मोठा नफा मिळू शकतो, यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील.

विद्यार्थी (Student) – ज्या मित्रांशी तुमचा बऱ्याच काळापासून काही संपर्क नव्हता, ते इतर लोकांद्वारे तुमच्या संपर्कात येऊ शकतात, त्यांच्याशी बोलून तुम्हाला तुमचे जुने दिवस आठवतील.

आरोग्य (Health) – तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. डोकेदुखीची समस्या कायम राहिल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तूळ (Libra Today Horoscope)

नोकरी (Job) – नोकरीच्या  ठिकाणी एखाद्या काम पूर्ण होण्यासाठी बराच वेळ पाहावा लागेल.

व्यवसाय (Business) – व्यावसायिकांसाठी दिवस चांगला राहील. मीटिंगला जाणार असाल तर  तुमच्यात  भरपूर आत्मविश्वास  असेल. 

तरुण (Youth) – जे प्रेमसंबंधात आहेत त्यांना त्यांच्या जोडीदाराचे म्हणणे समजून घ्यावे लागेल. तुमचे तुमच्या जोडीदारासोबत जोरदार भांडण होण्याची शक्यता

आरोग्य (Health) – शुगर किंवा बीपीचे रुग्ण असाल, तर तुम्हाला ठराविक अंतराने थोडे थोडे जेवण घ्यावे लागेल आणि औषधे नियमित घ्या, 

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)

नोकरी (Job) – तुमच्या कामाची तुलना इतर लोकांच्या कामाशी केली जाऊ शकते, जी तुम्हाला आवडणार नाही आणि तुम्हाला मानसिक ताणही येऊ शकतो

व्यवसाय (Business) – थकीत पैसे परत मिळू शकतात. आर्थिक अडचणींमुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला ज्या काही समस्या येत होत्या त्या आता संपू शकतात. पैशाअभावी रखडलेले काम तुम्ही पुन्हा सुरू करू शकता. 

तरुण (Youth) – काहीही करण्याआधी त्यांना खूप  विचार करा, मगच पाऊल उचला.

आरोग्य (Health) – तळलेले अन्न टाळले, शक्य तितके पाणी प्या आणि तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळले तर बरे होईल. तरच तुमचे आरोग्य चांगले राहू शकते.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) – तुमचे सहकारी चांगले काम करत नसतील तर तुमचे त्यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे. 

व्यवसाय (Business) – कर्मचाऱ्यांकडून सन्मान मिळू शकतो. व्यावसायिकांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांचा आदर केला पाहिजे.  

तरुण (Youth) – नोकरी करणारी महिलांना  तुमच्या आयुष्यात यश मिळू शकते.

आरोग्य (Health) – सणासुदीत चुकीचे अन्न खाल्ल्याने तुमचे पोट खराब होऊ शकते. घरगुती उपाय केल्यास चांगले होईल. जर तुम्हाला आराम मिळत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) – तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या विरोधात काही निर्णय घेतले जाऊ शकतात, मात्र यावर रागावू नका.कधी कधी परिस्थितीशी जुळून घेण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते.

व्यवसाय (Business) – दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल. व्यवसाय पुढे नेण्यासाठी प्रयत्न करा.  प्रामाणिकपणे व्यवसाय केलात तर तुमचा व्यवसाय चांगला चालेल.

तरुण (Youth) – भविष्याची कल्पना करू नये. फक्त कठोर परिश्रमावर विश्वास ठेवा, कारण कठोर परिश्रमानेच तुम्ही यश मिळवू शकता. तुमच्या कुटुंबातील काही लोक तुमच्या विरोधात जाऊ शकतात.

आरोग्य (Health) – तुमचा दिवस आनंदात जाईल आणि खूप मजा येईल. उद्या तुमचे मन प्रसन्न राहील.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) – आयुष्यात चढ-उतारांचा सामना करूनही तुम्ही तुमचे काम तुमच्या अपेक्षेनुसार करण्यात यशस्वी व्हाल, त्यामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील आणि ते तुम्हाला प्रगतीच्या संधी देऊ शकतात.  

व्यवसाय (Business) – व्यापारी वर्गाने संपर्क मजबूत करण्यावर भर द्यावा लागेल. चांगले नेटवर्क आणि चांगले मित्र तुमच्या व्यावसायिक करिअरमध्ये फायदेशीर ठरू शकतात. 

तरुण (Youth) – काही लोकांच्या वागण्याने नाराज होऊ शकता. तुमच्या जोडीदाराच्या वागण्यामुळे उद्या तुम्ही थोडे चिंतेत असाल. 

आरोग्य (Health) – तब्येतीबद्दल बोलायचे तर  तुमची प्रकृती ठीक राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे त्वचेचे आजार असल्यास तुमची समस्या वाढू शकते. कोणत्याही प्रकारच्या कॉस्मेटिक वस्तू वापरताना थोडी काळजी घ्या. उत्पादनाचा दर्जा पाहूनच त्याचा वापर केला तर बरे होईल.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) – तुमच्या कामाचा इतर लोकांच्या कामावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या.  अन्यथा तुमच्याशी भांडण होऊ शकते. 

व्यवसाय (Business) – दिवस व्यावसायिकांसाठी अनुकूल असेल.  तुम्हाला तुमच्या व्यवसायातून अपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल आणि तुमचे राहणीमानही बदलेल.

तरुण (Youth) – अभ्यासात काही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिक्षणाशी संबंधित सर्व विषयांच्या उजळणीकडे अधिक लक्ष दिल्यास बरे होईल, अन्यथा यश मिळविण्यात तुम्ही मागे पडू शकता.

आरोग्य (Health) – स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आहाराचे पालन करा. तुम्ही योगा केलाच पाहिजे.  जर तुम्ही मानसिक तणावाखाली असाल तर  ध्यानाची मदत घेऊ शकता, यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल.

Horoscope
Horoscope

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Horoscope
Horoscope

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Horoscope
Share the Post:
error: Content is protected !!