ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Horoscope Today

Horoscope Today : रविवार ३ मार्च २०२४

Horoscope Today 3 March 2024 : प्रत्येकालाच आज माझ्या आयुष्यात काय घडणार? आजचं माझं भविष्य काय? किंवा आजचा आपला दिवस कसा असणार? असा विचार येतो आणि ते जाणून घेण्याचीही उत्सुकता असते. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच राशीभविष्य जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीलं आहे? कोणासाठी आजचा दिवस शुभ किंवा कोणासाठी आजचा दिवस अशुभ? हे जाणून घेण्यासाठी आजचे राशीभविष्य (Horoscope Today 3 March 2024) सविस्तरपणे पाहूया… 

मेष (Aries Today Horoscope)

तुमचं मन आज थोडं अस्वस्थ राहू शकतं. तुमच्या मनात वाईट विचार येऊ शकतात, त्यामुळे ध्यान (Meditation) करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एखाद्याला दिलेले पैसे आज तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला आज सुट्टी नसेल आणि आजचा दिवस ऑफिसमध्ये कामाचा असेल, तर आज तिथे अधिकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होईल. व्यवसायासाठी केलेला प्रवास चांगला राहील. पैशाची गुंतवणूक शुभ राहील. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील.

वृषभ(Taurus Today Horoscope)

तुमचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज केलेल्या कार्यामुळे उद्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडून शाबासकीची थाप मिळेल. परीक्षेत चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. आज तुमची आर्थिक स्थिती आधापेक्षा चांगली होईल. जीवनात अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. आज तुमचा रविवारच्या सुट्टीचा दिवस आनंदात जाईल. तु्म्हाला आर्थिक लाभ होईल आणि व्यवसायात प्रगती होईल.

मिथुन (Gemini Today Horoscope)

आज तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद असेल. तुम्ही कुटुंबासोबत जास्त वेळ व्यतित कराल. आज तुमच्या व्यवसायात स्थिरता आणण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला यश मिळू शकतं. काही लोकांशी सुरू असलेले तुमचे वाद आज संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तुमचं वैवाहिक जीवन आज अधिक बहरेल. नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो. आज तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वादात पडणं टाळावं लागेल.

कर्क (Cancer Today Horoscope) 

आजचा सुट्टीचा दिवस तुमच्यासाठी प्रलंबित कामं पूर्ण करण्याचा असेल. आज तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकण्याची शक्यता आहे. पालकांशी कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. जुने आजार त्रास देऊ शकतात, त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. व्यवसायाची स्थिती चांगली दिसत आहे, आज तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. वाहन वापरताना काळजी घ्या,  दुखापत होण्याची शक्यता आहे. तुमचं व्यक्तिमत्व सुधारणं अपेक्षित आहे.

सिंह (Leo Today Horoscope) 

आज तुमचा नवीन शत्रू निर्माण होण्याची भीती आहे. कृषी क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात तात्पुरतं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगा. व्यावसायिक करार सावधगिरीने हाताळा. आज तुमचं मन अस्वस्थ राहू शकतं. आज घरी खाण्याचा चांगला बेत असेल, जे पाहून तुमचं मन खुश होईल. विद्यार्थ्यांनी आज अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे, विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. आज आरोग्याची विशेष काळजी घ्या, तुमची तब्येत बिघडू शकते.

कन्या (Virgo Today Horoscope) 

आज तुम्हाला बराच मोकळा वेळ मिळेल आणि तुम्ही विचारांत दिवस घालवाल. अतिविचारांमुळे आज तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो. काही गोंधळाची स्थिती असेल तर ती तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोलून सोडवली जाऊ शकते. आज तुम्ही मित्रांना भेटलात तर तुमचं मन हलकं होईल. आज तुमची धार्मिक कार्यातील आवड वाढेल. तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीमध्ये पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल, तरच तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. बदलत्या हवामानामुळे आरोग्य बिघडू शकतं.

तूळ (Libra Today Horoscope) 

तुमचा आजचा दिवस सामान्य असेल अशी अपेक्षा आहे. जोडीदारासोबतचे प्रेमसंबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात काही कारणावरून तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आर्थिक समस्या कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. काम वेळेवर न झाल्यामुळे मानसिक तणाव कायम राहू शकतो. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींसोबत थोडा वेळ घालवू शकाल. आज मानसिक आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आज तुमच्या नोकरीत तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी प्रवास करू शकता. आज बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नका, अन्यथा खर्च वाढल्याने अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. आज कुटुंबातील सदस्यांशी मतभेद संभवतात. जमीन आणि घर खरेदी-विक्रीचा विचार करता जाईल. व्यवसायात मोठे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले निकाल मिळू शकतात. आरोग्याबाबत जागरूक राहणं गरजेचं आहे.

धनु (Sagittarius Today Horoscope)

आज तुम्हाला किरकोळ समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. हनुमानाची पूजा केल्याने दिवस चांगला जाईल. तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्या लागतील. व्यवसायात आर्थिक लाभ अपेक्षित आहे. तुमच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल शंका असू शकते. आज तुमच्या एखाद्या कामात काही अडचण येऊ शकते. आज तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत चिंतित असाल.

मकर (Capricorn Today Horoscope)

आजचा दिवस तुम्हाला व्यवहारात सावध राहण्याचा आहे. तुम्हाला अनेक क्षेत्रात यश मिळू शकतं. करिअरच्या दृष्टिकोनातून दिवस चांगला जाईल.ज्या योजनेवर तुम्ही सतत काम करत होता त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात दिवस सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. आज तुम्ही जुन्या मित्रांना किंवा प्रियकराला भेटाल. लांबच्या प्रवासाला जाण्याचे बेत आखले जातील. तुम्हाला एखादी मोठी चांगली बातमी मिळू शकते. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज तु्मच्या एखाद्या कामात अडचण येऊ शकते.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

आज तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता. आपल्या भावना व्यक्त करता न आल्याने नाराज होणं टाळा. संयमाची फळं गोड असतात, म्हणून प्रत्येक गोष्टीला वेळ द्या. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहण्याची शक्यता आहे. व्यवसाय किंवा नोकरीत कोणतीही जोखीम घेतल्यास नुकसान होऊ शकतं. आज तुम्ही तुमची प्रलंबित कामं पूर्ण करू शकता. वेळेचा चांगला फायदा करुन घ्या. हंगामी आजारांपासून सुरक्षित राहावं लागेल.

मीन (Pisces Today Horoscope)

आज तुमचे तुमच्या जोडीदारासोबत काही वाद होऊ शकतात. नाती जपताना काही चुका संभवतात, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आज तुमच्या कुटुंबात काही मतभेद होऊ शकतात. नवीन कपड्यांवर तुमचा जास्त खर्च होईल. पैशांची गुंतवणूक करा, यातून भविष्यात तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला नशीब पूर्ण साथ देईल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. आज तुमची तब्येत ठीक राहील.

Horoscope Today
Horoscope Today

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Horoscope Today
Horoscope Today

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Horoscope Today
Share the Post:
error: Content is protected !!