ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Horoscope Today

Horoscope Today 7 April 2024 : पंचांगानुसार, आज 7 एप्रिल 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा रविवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या

मेष (Aries Horoscope Today)

आर्थिक स्थिती सुधारली तरी पैसे खर्च होण्याची दाट शक्यता आहे. प्रवासाचे योग आहेत. स्थावर इस्टेटसंबंधी निर्णय घ्याल. महिला संतती बाबत समाधानी राहतील. 

वृषभ (Taurus Horoscope Today)

आज अतिभावना दाखवणे काही वेळेस बाधक ठरेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासातून आपले लक्ष विचलित होऊ देऊ नये. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानावे लागेल. महिलांना थोडी अस्वस्थता जाणवेल.

मिथुन (Gemini Horoscope Today)

समजुतीचे धोरण स्वीकारायला हरकत नाही, पण त्याचा मनावर जास्त ताण येऊ देऊ नका. गुप्तशत्रू त्रास देतील, अशावेळी श्रद्धा आणि सत्संग याचा मागोवा घ्या. महिलांनी नकारात्मक विचारांना बाजूला ठेवावे.

कर्क  (Cancer Horoscope Today)

नोकरीधंद्यात कोणतीही गोष्ट व्यवहाराच्या मुशीत घालून तपासून घ्या, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढे जाणारे ग्रहमान आहे. महिलांनी आपली मते स्पष्टपणे मांडावीत.

सिंह  (Leo Horoscope Today)

प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी जीवाचे रान कराल. घरामध्ये जरा जास्तच पैसा खर्च होईल. संशोधनात उत्तुंग झेप घ्याल, जुनी दुखणी डोके वर काढतील.

कन्या (Virgo Horoscope Today)

आत्मविश्वासाने कोणत्याही समस्येशी टक्कर द्याल. जोमाने कामाला लागाल. व्यवसायात एक नवीन चैतन्य निर्माण कराल. राजकारणी लोक तळागाळात जाऊन काम करतील. महिलांना कुटुंबात तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल.

तूळ (Libra Horoscope Today)

जोडीदाराशी छान जमेल, परंतु त्याच्या आरोग्याविषयी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. अति कष्ट प्रकृतीला झेपणार नाहीत. घरातील लोकांचे सहकार्य चांगले मिळेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

गृहशोख्यात भर पडेल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांना खुश ठेवाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष घालत असताना आवड निर्माण होऊन अभ्यासात यश मिळेल. प्रेम प्रकरणात यशस्वी व्हाल.

धनु (Sagittarius Horoscope Today)

जवळच्या प्रवासाचे योग येतील कामाच्या ठिकाणी पूर्वीची एखादी योजना रद्द करावी लागेल. परदेशाशी संबंधित असलेल्या व्यवहारांमध्ये थोड्या अडचणी निर्माण होतील. महिलांना दुटप्पी वागण्याचा थोडा त्रास होईल.

मकर (Capricorn Horoscope Today)

सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना थोडी टीका सहन करावी लागेल. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना संधी चालून येतील. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. महिलांना घरातील पूर्ण वेळ उपस्थितीची सर्वांची अपेक्षा पूर्ण करावी लागेल.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

कोणताही मोह न ठेवता काम करावे लागेल. घरात मंगल कार्य ठरतील विद्यार्थी स्वतः बदल करतील. नोकरी करणारे नवीन नोकरीच्या शोधात राहतील. हाताची दुखणी त्रास देऊ शकतात.

मीन (Pisces Horoscope Today)

जुने मित्र भेटतील. नवनवीन स्वप्न बघायला हरकत नाही संधीचे सोने कराल. महिलांनी दिलेल्या शब्दाला जागावे. संधिवाताचा त्रास असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.

Horoscope
Horoscope

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Horoscope
Horoscope

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Horoscope
Share the Post:
error: Content is protected !!