ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

IND vs ENG

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धरमशाळेत रंगणार आहे. या सामन्यातूनही केएल राहुल बाहेर होऊ शकतो.

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धरमशाळेत रंगणार आहे. या सामन्यातूनही केएल राहुल बाहेर होऊ शकतो. माध्यमातील वृत्तानुसार केएल राहुल दुखापतीवर उपचार घेण्यासाठी लंडनला रवाना झाला आहे. तो मालिकेतील पहिल्याच सामन्यात खेळताना दिसून आला होता. मात्र त्यानंतर त्याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं.भारत आणि इंग्लंड(IND vs ENG) यांच्यातील पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये पार पडला होता. या सामन्यात केएल राहुल खेळताना दिसून आला होता.

यादरम्यान त्याने ८६ धावांची खेळी केली होती. हा सामना झाल्यानंतर तो दुखापतग्रस्त असल्याची माहिती समोर आली होती. तेव्हापासून तो भारतीय संघात खेळताना दिसून आलेला नाही. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार केएल राहुल दुखापतीवर उपचार घेण्यासाठी लंडनला रवाना झाला आहे. केएल राहुल मैदानावर केव्हा परतणार याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

केएल राहुलला मध्यक्रमात फलंदाजी करण्याची संधी दिली गेली होती. या संधीचा पुरेपूर फायदा घेत त्याने पहिल्याच डावात ८६ धावांची खेळी केली होती. दरम्यान दुसऱ्या डावात तो २२ धावा करत माघारी परतला होता. त्याच्या एकूण कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ५० कसोटी सामन्यांमध्ये २८६३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ८ शतक आणि १४ अर्धशतकं झळकावली आहेत.

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धरमशाळेत पार पडणार. भारतीय संघाला या मालिकेतील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पुढील ३ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे.

newasa news online
IND vs ENG

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

IND vs ENG
IND vs ENG

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

IND vs ENG

Share the Post:
error: Content is protected !!