ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

IND vs ENG

IND vs ENG 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका (IND vs ENG) आता अखेरच्या टप्प्यात आहे. बॅझबॉल आल्यानंतर इंग्लंड सलग सात कसोटी मालिकेत अजेय होता, पण भारताच्या भूमीत त्यांना पराभव पाहावा लागलाय.

IND vs ENG 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका (IND vs ENG) आता अखेरच्या टप्प्यात आहे. भारतीय संघाने (Team India) चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. आता अखेरचा कसोटी सामना पुढील महिन्यात सुरु होणार आहे. त्याआधी इंग्लंडचा संघ ब्रेकवर गेलाय. लागोपाठ तीन सामन्यात पराभवाचा सामना करणारा इंग्लंडचा संघ नव्या दमाने मैदानात उतरेल. अखेरचा सामना जिंकून इंग्लंडचा संघ शेवट गोड करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल, याच शंकाच नाही. इंग्लंडच्या अतिआक्रमक बॅझबॉल भारतीय भूमीवर सपशेल अपयशी ठरला.

भारताचा हैदराबाद कसोटीमध्ये पराभव करत इंग्लंडनं दणक्यात सुरुवात केली, पण त्यानंतर भारताने पलटवार केला. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने सलग तीन सामन्यात विजय मिळवला. विशाखापट्टणम कसोटीत भारताने 106 धावांनी विजय मिळवला. राजकोट कसोटी सामन्यात 434 धावांनी विजय मिळवला, त्यानंतर रांची कसोटीत पाच विकेटने मात केली. आता अखेरचा सामना जिंकून शेवट गोड कऱण्यासाठी साहेब मैदानात उतरली. तर भारतीय संघही विजयाच्या इराद्यानेच मैदानात उतरेल. दरम्यान, बॅझबॉल आल्यानंतर इंग्लंड सलग सात कसोटी मालिकेत अजेय होता, पण भारताच्या भूमीत त्यांना पराभव पाहावा लागलाय.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचा कसोटी सामना कधी आहे ?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचा पाचवा कसोटी सामना सात मार्च ते 11 मार्च यादरम्यान होणार आहे. 

पाचवा कसोटी सामना कुठे होणार ?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना हिमाचल प्रदेशच्या धरमशालामध्ये एचपीसीए स्टेडियमवर पार पडणार आहे. 

पाचवा कसोटी सामना किती वाजता सुरु होणार ?

मालिकेतील अखेरचा कसोटी सामना सकाळी 9.30 वाजता सुरु होईल. त्याआधी अर्धा तास नाणेफेक होईल. 

कुठे पाहाल अखेरचा सामना ?

जिओ अॅपवर मोफत सामना पाहता येईल. टिव्हीवर स्पोर्ट्स 18 या चॅनलवर सामना पाहता येईल. त्याशिवाय सामन्यासंदर्भातील सर्व अपडेट एबीपी माझाच्या वेबसाईटवर वाचायला मिळतील. 

तीन टप्प्यात होईल प्रत्येक दिवसाचा खेळ – 

पाचव्या कसोटी मालिकेतील दिवसाचं पहिलं सत्र दोन तासांचं असेल. म्हणजे, 11.30 वाजेपर्यंत पहिल्या सत्रात सामना होईल. त्यानंतर 40 मिनिटांचा लंच ब्रेक असेल. दुपारी 11.10 वाजता पुन्हा सामन्याला सुरुवात होईल. दुसरं सत्रही दोन तासांचं असेल. भारतीय वेळानुसार, दुपारी 2.10 वाजता चायपाण्याचा ब्रेक असेल. 20 मिनिटांच्या या ब्रेकनंतर अखेरच्या सत्राला सुरुवात होईल. 2.30 मिनिटांनी अखेरच्या सत्राला सुरुवात होईल.  4.30 वाजता दिवसाचा खेळ संपेल. 

IND vs ENG

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

IND vs ENG
IND vs ENG

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

IND vs ENG
Share the Post:
error: Content is protected !!