ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

BJP

इसिस या दहशतवादी संघटनेकडून देशातील भाजप(BJP) कार्यालयांवर हल्ला करण्याचा प्लान होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

इसिस या दहशतवादी संघटनेकडून देशातील भारतीय जनता पक्षाच्या(BJP) कार्यालयांवर हल्ला करण्याचा प्लान होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयएने अटक केलेल्या इसिसच्या मोहम्मद जोहेब याच्या चौकशीतून हा खळबळजनक खुलासा झाला आहे. इसिसचा हिंदू नेत्यांच्या हत्येचा देखील प्लान होता, असं देखील जोहेबने नमूद केलं आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने जोहेबला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. त्याची कसून चौकशी करण्यात आली असता, बरीच धक्कादायक माहिती त्यामधून समोर आली. हल्ल्यासाठी पिस्तुल, स्फोटकं, सिम कार्ड उपलब्ध करून मिळाली, अशी माहितीदेखील जोहेबने दिली. येथून राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ने सहा दिवसांपूर्वी संभाजीनगर येथून एका व्यक्तीला अटक केली होती. त्यासाठी NIA ने ९ ते १० ठिकाणी छापेही मारले होते. त्यानंतर एका व्यक्तीला अटक करून एनआयने त्याचा तपास करत कसून चौकशी सुरू केली. त्यावेळी मोहम्मद जोहेब याच्याकडून धक्कादायाक माहिती उघड झाली.

इसिसने संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रातही हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील भाजप(BJP) कार्यालय असो किंवा संपूर्ण देशातील भाजप कार्यालयावरती सुद्धा हल्ला करण्याचा इसिसचा प्लान ठरला होता. तसेच देशातील काही मोठ्या हिंदू नेत्यांच्या हत्येचादेखील कट रचण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती तपासातून उघड झाली. त्यासाठी मोहम्मद जोहेब याला एक सिम कार्ड देखील पुरवण्यात आलं होतं आणि त्याच माध्यमातून टेलिग्राम लिंकच्या द्वारे त्याच्याशी संवाद साधण्यात येत होता.

भाजप

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भाजप
भाजप

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भाजप
Share the Post:
error: Content is protected !!