ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Cricket

गेल्या काही दिवसात एका मागोमाग एक अशा निवृत्तीच्या घोषणा होत आहे. आता कोहलीनेही निवृत्तीचा मार्ग स्वीकारला क्रिकेटला(Cricket) कायमचा रामराम ठोकला आहे. अंडर 19 वर्ल्डकपपासून सुरु झालेला प्रवास आयपीएलपर्यंत संपुष्टात आला आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये कोहलीची कामगिरी जबरदस्त राहिली आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सुरु असताना क्रीडाविश्वात अनेक घडामोडी घडत आहेत. गेल्या महिनाभरात डझनभर दिग्गज क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली असताना आणखी एक नाव समोर आलं आहे. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वात आणखी एक कोहली खेळला होता.2008 अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद टीम इंडियाने मिळवलं होतं. त्यावेळेस तरूवर कोहली संघासाठी ओपनिंग करत होता. आता वयाच्या 36 व्या वर्षी तरुवर कोहलीने क्रिकेटविश्वाला रामराम ठोकला आहे.

तरुवर कोहली फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. पण टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली नाही. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये(Cricket) त्याच्या नावावर त्रिशतकाची नोंद आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 53 राहिली आणि त्याने 14 शतकंही ठोकली आहेत. तरुवर कोहलीला टीम इंडियात स्थान मिळालं नाही पण आयपीएलमध्ये काही खास करू शकला नाही. त्यामुळे क्रीडारसिकांचं लक्ष वेधून घेण्यात अपय़शली ठरला. 2009-2010 दरम्यात त्याच्या क्रिकेट(Cricket) कारकिर्दिला गळती लागण्यास सुरुवात झाली होती. पण 2013 मध्ये रणजी ट्रॉफीत त्रिशतक ठोकत पुन्हा एकदा चर्चेत आला होता.

तरुवर कोहलीने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 55 सामने खेळले आणि 97 डावात 4573 धावा केल्या. यात 74 विकेट्सही नावावर आहे. या व्यतिरिक्त लिस्ट एमधेय कोहलीने 72 सामने खेळले आणि 1913 धावा केल्या. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 14 शतकं आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त लिस्ट ए मध्ये 3 शतकं, 11 अर्धशतकं आणि 41 विकेट्स आहेत.

कोण आहे तरुवर कोहली? (Who Is Taruwar Kohli?)

तरुवर कोहली हा उजव्या हाताचा फलंदाज होता. त्यांचा जन्म 17 डिसेंबर 1988 रोजी पंजाबमधील जालंधर येथे झाला. तरुवर उत्तम गोलंदाजीही करायचा. तो उजव्या हाताचा मध्यम गोलंदाजही होता. आयपीएल 2008 मध्ये त्याला राजस्थान रॉयल्सनं तरुवरला विकत घेतलं होतं. त्यानंतर 2009 मध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाब (आताचा पंजाब किंग्ज) चा देखील तरुवर कोहली महत्त्वाचा भाग होता. तरूवरचे वडील सुशील कोहली हे सुद्धा स्पोर्ट्स पर्सन होते, पण ते जलतरणपटू होते.(Cricket)

तरुवर कोहली आयपीएलमध्ये मात्र आपली छाप सोडू शकला नाही. 2009 – 2010 नंतर त्याचं नाव हळूहळू क्रिकेट जगतातून गायब झालं. त्यानंतर 2013 रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबकडून खेळताना तिहेरी शतक झळकावून तो पुन्हा चर्चेत आला. 

Cricket

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Cricket
Cricket

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Cricket
Share the Post:
error: Content is protected !!