ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीतील पक्षांना भरभरून मतदान केल्याचं बोललं जातंय.

Ladki Bahin Yojana : राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) गेमचेंजर ठरली. त्यानंतर आता निवडणुकीआधी देण्यात आलेल्या आश्वासनानुसार आता राज्यातील लाडक्या बहिणींना या योजनेच्या अंतर्गत रक्कम वाढवून मिळणार का अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान या योजनेला पिंपरी-चिंववड शहरातून देखील चांगलाच प्रतिसाद मिळाला. पिंपरी-चिंववडमधून तब्बल 4 लाख 32 हजार 890  अर्ज लाडक्या बहिणींनी भरले होते. त्यापैकी 3 लाख 89 हजार 920 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या. त्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे दरमहा दीड हजार रुपयांची रक्कम त्यांना मिळाली आहे. तर, 42 हजार 486 अर्ज बाद ठरण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरामधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेसाठी तब्बल 4 लाख 32 हजार 980 अर्ज भरण्यात आले होते. महिलांनी महापालिका केंद्र, ऑनलाईन,नागरी सुविधा केंद्र, अंगणवाडी सेविका या माध्यमातून अर्ज भरले होते. हे अर्ज 30 सप्टेंबर 2024 पर्यंत स्वीकारण्यात आले. त्यानंतर अर्ज करण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली. मिळालेल्या अर्जांपैकी 3 लाख 89 हजार 920 अर्ज वैध ठरले. तर, 42 हजार 486 अर्ज बाद ठरण्यात आले आहेत. वैध ठरलेल्या अनेक लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला. योजनेतून मिळणारी रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. 

कोणत्या कारणांनी अर्ज ठरले बाद

अवैध ठरलेल्या अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे नसणं, पिंपरी-चिंचवड शहराबाहेरील, मर्यादेपेक्षा उत्पन्न जास्त, एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांचे अर्ज, मुदतीमध्ये अर्ज प्राप्त न होणे आदी कारणांमुळे हे अर्ज बाद ठरण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर

विधानसभा निवडणुकीच्या आधी काही महिने महायुती सरकारकडून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेत पात्र ठरणार्‍या महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. सरकारकडून ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीतील पक्षांना भरभरून मतदान केल्याचं बोललं जातंय. (Ladki Bahin Yojana) 

Ladki Bahin Yojana

महिलांना मिळणार 2100 रुपये

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. काल 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी पार पडला. त्यानंतर मंत्रालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत वाढीव हप्ता कधी मिळणार? अशी विचारणा करण्यात आली. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहेत. तसेच महिलांना मिळणारा लाभ 2100 रुपये करणार आहोत. आता अर्थसंकल्पाच्या वेळी आम्ही त्याचा विचार करू. शेवटी आपले आर्थिक योग्य प्रकारे चॅनेलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Ladki Bahin Yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!