ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Maharashtra News

Maharashtra News : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar passed away) यांचे आज सकाळी (31 जानेवारी) आकस्मिक निधन झाले आहे.(Maharashtra News)

Maharashtra News : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar passed away) यांचे आज सकाळी (31 जानेवारी) आकस्मिक निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे राजकारणात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रात आमदार अनिल बाबर (Anil Babar passed away) यांना ‘पाणीदार आमदार’ म्हणून ओळखले जाई. खानापूर-आटपाडी येथे पाण्याची कायमच टंचाई होती. जायकवाडी प्रकल्पातून या भागाला पाणी देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडून त्यांनी प्रयत्न केले. पुढे या योजनेला ‘ टेंभू योजना’ असे नाव देण्यात आले.(Maharashtra News)

सांगली जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचे ते एकमेव आमदार होते. एकनाथ शिंदे यांच्या ते कायम जवळचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वच राजकीय पक्षाकडून शोक व्यक्त केला जात आहे.7 जानेवारी 1950 रोजी आमदार अनिल बाबर (Anil Babar passed away) यांचा जन्म झाला. त्यांनी वयाच्या 22 व्या वर्षीच म्हणजेच 1972 साली राजकारणात प्रवेश केला. जिल्हा परिषदेचे सदस्य बनल्यानंतर ते आमदार झाले. 1990 साली अनिल बाबर आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले होते.

यासोबतच त्यांनी 1982 ते 1990 खानापूर पंचायत समितीचे अध्यक्ष पदही भूषविले. 1990 मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक जिंकत विधानसभेत प्रवेश केला.पुढे 2014 आणि 2019 अशा सलग दोन विधानसभा निवडणूकही त्यांनी जिंकल्या. यासोबतच त्यांनी साखर कारखाने आणि जिल्हा बँकमध्येही पद भूषविले.

Maharashtra News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Maharashtra News
Maharashtra News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Maharashtra News
Share the Post:
error: Content is protected !!