ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Politics

Maharashtra Politics : ईडी ही यंत्रणा भाजपाचा सहकारी पक्ष असल्यासारखी वागते आहे असा गंभीर आरोप शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर केला आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्रासह देशभरात ईडी या तपासयंत्रणेचा गैरवापर केला जातो आहे. केंद्र सरकार ईडीचा वापर विरोधकांना निरस्त करण्यासाठी करते आहे. ईडी ही यंत्रणा भाजपाचा सहकारी पक्ष असल्यासारखी वागते आहे असा गंभीर आरोप शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर केला आहे. सध्या आम्ही निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होईल त्याची वाट पाहतो आहोत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

या देशातील एजन्सींचा वापर निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या लोकांसाठी यापूर्वी फारसा कधी झाला नाही. सध्याच्या घडीला ईडी, सीबीआय इतर एजन्सींचा वापर ठिकठिकाणी गैरवापर केला जातो आहे. कर्नाटकमध्ये एका वरिष्ठ माणसाच्या संदर्भात कारवाई झाली. अटक करण्यात आली. डी. के. शिवकुमार यांना न्यायालयाने निर्दोष सोडलं. एखाद्या राज्यातला इतका वरिष्ठ नेता त्याला अटक करणं, कोर्टाने त्याला सोडणं याचा अर्थ स्वच्छ आहे की ईडीचा गैरवापर केला जातो. महाराष्ट्रात या सगळ्याचा वापर सुरु झाल्याचं दिसतं आहे. (Maharashtra Politics )

अनिल देशमुख यांनी एका संस्थेला १०० कोटी रुपये दिल्याचा आरोप अनिल देशमुखांवर झाला होता. त्यासाठी त्यांना अटकही झाली. आता असं दिसतं आहे की चार्जशीटमध्ये ती रक्कम १ कोटी आहे. तसंच ती देणगी आहे. तरीही देशमुख यांना त्यात अडकवण्यात आलं. आता न्यायालयाचा निर्णय काय लागेल ते पाहणं आवश्यक आहे. एक प्रकारची दहशत निर्माण केली जाते आहे. रोहित पवार यांना दोन ते तीन दिवसांत चौकशीसाठी बोलवलं गेलं आणि त्यांच्या संस्थेची जप्ती करणं आणि कारवाई सुरु करणं हे दिसतं आहे.(Politics)

त्यांच्यावरचा आरोप असा आहे की ते साखर कारखाना विकत घेतानाचं त्यांचं टेंडर मोठं होतं. आता बँकेने विकलेल्या कारखान्यांची यादी पाहिली तर ते २५ कोटींच्या आत साखर कारखाने विकले गेले तिथे कारवाई नाही. ५४ कोटीला कारखाना गेल्यावर चौकशी सुरु झाली. दहशत निर्माण करणं, सक्रिय कार्यकर्त्याला थांबवणं हे यामागे दिसतं आहे.” असं शरद पवार म्हणाले.

newasa news online
Politics

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Politics
Politics

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Politics
Share the Post:
error: Content is protected !!