ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Weather

Weather Update : चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांसह नागपूर जिल्ह्यातील मौदा, कुही व कामठी तालुक्यांना गारपिटीने जोरदार तडाखा दिला. तर शहरातही विजांसह वादळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे रब्बीतील गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे.

Maharashtra Weather Update : थंडीचा ओघ संपत नाही तोच राज्यात काही भागात वरुण राजाने हजेरी लावली. फेब्रुवारी महिना हा तसा उन्हाळ्याची चाहूल देणारा असतो. मात्र या महिन्यात पावसासह (Maharashtra Weather Update) गारपीटही झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हवामान विभागाने याचा अंदाज वर्तवला होताच.त्यानुसार काल (11 फेब्रुवारी) उपराजधानी नागपूरसह ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला. चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांसह नागपूर जिल्ह्यातील मौदा, कुही व कामठी तालुक्यांना गारपिटीने जोरदार तडाखा दिला. तर शहरातही विजांसह वादळी पावसाने हजेरी लावली. विदर्भामध्ये आजही (12 फेब्रुवारी) जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पावसाचा फटका नांदेड जिल्ह्यालाही चांगलाच बसला. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, हदगाव, उमरी, मुदखेड आणि किनवट तालुक्याला रविवारी वादळी वारा, अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे रब्बीतील गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. तर, उमरी तालुक्यातील चार गावे, हिमायतनगर तालुक्यातील 13 गावे आणि किनवट तालुक्यातील धामणदरी या गावांमध्ये गारपीट झाली आहे.

मध्यभारतात तयार झालेल्या ‘सायक्लोनिक सर्क्युलेशन ‘मुळे सध्या विदर्भात पावसाळी वातावरण आहे. शनिवारी यवतमाळ, अमरावती व वर्धा जिल्ह्यांमध्ये पाऊस व गारपिटीने धुमाकूळ घातल्याने पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मौदा, कुही तालुके व कामठी परिसरात गारा पडल्या. अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, तूर, मिरची, टोमॅटो, कापूस, पालेभाज्या व अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.नागपूरमध्येही पाऊस झाला. उत्तर नागपुरातील (Maharashtra Weather Update) गोधनी, मानकापूरसह अनेक भागांमध्ये ताशी 30 ते 40 मी वेगाने सोसाट्याचा वाऱ्यासह जवळपास अर्धा तास पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील काही भागांत हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या (Weather Update) अंदाजानुसार, आज विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा पाऊस हजेरी लावू शकतो. त्यामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अतिशय कमी राहील.

Weather

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Weather
Weather

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Weather
Share the Post:
error: Content is protected !!