ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Mamata Banerjee

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून घरी ट्रेडमिलवर चालतेवेळी कोसळल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला.

Mamata Banerjee :  पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून घरी ट्रेडमिलवर चालतेवेळी कोसळल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. योग्य ते उपचार आणि तपासण्या केल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. टीएमसीनं सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटलं होतं की, आमच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी गंभीर जखमी झाल्या आहेत. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा.

डोक्याला दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांचं एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणार आहे. पश्चिम बंगालमधील एसएसकेएम रुग्णालयाचे संचालक डॉ. मणिमॉय बंदोपाध्याय यांनी यासंदर्भात माहिती दिली. घरी पाय घसरून पडल्यानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे डॉक्टरांनी त्यांच्या जखमेवर टाके घालून उपचार केले. तसेच, त्यानंतर आवश्यक त्या सर्व तपासण्या देखील करण्यात आल्या आहेत. 

रुग्णालयाचे संचालक डॉ. मनिमॉय बंदोपाध्याय यांनी गुरुवारी (14 मार्च) रात्री प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापतीवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांना मागून धक्का लागल्यामुळे त्या पाय घसरुन पडल्या. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितलं की, डॉक्टरांनी त्यांच्या कपाळावर तीन टाके घातले आणि एक टाका नाकाला झालेल्या दुखापतीला घातला आहे.

डॉ. मनिमॉय बंदोपाध्याय म्हणाले की, “आम्हाला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची माहिती मिळाली की, मागून ढकलल्यामुळे त्या घरात पडल्या आहेत. त्यांच्या डोक्याला जखम झाली असून कपाळ आणि नाकावर दुखापत झाली आहे. त्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला होता. ते म्हणाले की, “रुग्णालयातील एचओडी न्यूरोसर्जरी, एचओडी मेडिसिन आणि कार्डिओलॉजिस्ट यांनी ममता बॅनर्जींची तपासणी केली. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच, सर्व आवश्यक तपासण्या करुन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 

Mamata Banerjee

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Mamata Banerjee
Mamata Banerjee

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Mamata Banerjee
Share the Post:
error: Content is protected !!