ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Manohar Joshi

Manohar Joshi : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले मनोहर जोशी यांचे निधन झाले आहेत. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली असून, मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या (Mumbai) हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Manohar Joshi Passed Away : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले मनोहर जोशी यांचे निधन झाले आहेत. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली असून, मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या (Mumbai) हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मनोहर जोशी (Manohar Joshi Passed Away) यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. 

कोण होते मनोहर जोशी ?

मनोहर जोशी(Manohar Joshi) याचं जन्म 2 डिसेंबर 1937 रायगड जिल्ह्यातील नांदवी छोट्याशा गावात झाले. त्याचं शिक्षण चौथीपर्यंत नांदवीला, पाचवी महाडला, सहावीनंतर पनवेलला मामांकडे. मामांची बदली झाल्यामुळे गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करून मित्राच्या खोलीत भाड्याने राहिले. जेवणाची सोय महाजन नावाच्या महिलेनी केली. अकरावीला शिकण्यासाठी मुंबईला बहिणीकडे आले. सहत्रबुध्दे क्लासमध्ये शिपायाची नोकरी करून शिक्षण सुरु ठेवले. किर्ती कॉलेजमधुन बी. ए. केले. पुढे मुंबई महानगरपलिकेत क्लार्कची नोकरी केली. पुढे वयाच्या 27 व्या वर्षी एम.ए., एल एल.बी. केली. दरम्यान, 1964 ला अनघा यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. त्यांचा एक मुलगा व दोन मुली असा परिवार होता. 

समाजकारणाच्या उद्देशाने व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे मनोहर जोशी यांनी 1967 साली शिवसेनेत प्रवेश करत राजकारणात सक्रीय सहभागी झाले. पुढे महानगरपालिकेत नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास पाहायला मिळाला. विशेष म्हणजे 1999 ते 2002 या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. 

राजकीय प्रवास…

 • 2 वेळा नगरसेवक 
 • 3 वेळा विधानपरिषद सदस्य
 • मुंबई महानगरपालिका महापौर (1976 -77) 
 • 2 वेळा विधानसभा सदस्य
 • विरोधी पक्षनेता – विधानसभा (1990- 91) 
 • मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य (1995-99) 
 • केंद्रीय मंत्री (अवजड आणि सार्वजनिक उद्योग खाते)
 • लोकसभा अध्यक्ष (1999- 2002) 
 • राज्यसभा खासदार (2002-2004)

साहित्यक्षेत्र कामगिरी…

 • डॉ. मनोहर जोशी यांनी लिहिलेली पुस्तके : 15 
 • डॉ. मनोहर जोशी यांच्यावर मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये इतर लेखकांनी 17 पुस्तके लिहिली आहेत. ऑडिओ बुक्स 10 आहेत. 
मुख्यमंत्री असतांना घेतलेले महत्वाचे निर्णय…
 • मुंबईमध्ये 50 उड्डाणपूल आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस वे चा निर्णय.
 • औद्योगिक गुंतवणुकीकरिता ऍडव्हान्टेज महाराष्ट्र ही जागतिक परिषद
 • कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळावे म्हणून ऍग्रो ऍडव्हान्टेज महाराष्ट्र परिषद
 • महाराष्ट्राच्या विविध क्षेत्राच्या विकासाकरिता 60 जीवनदायी योजना
 • 1994  ला जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजची स्थापना

कॅनडा, अमेरिका, मॉरीशियस, चीन सारख्या अनेक देशांत भारतीय शिष्टमंडळातून भेट. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, हाँगकाँग, रशिया, इराण, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, झांबिया आणि आखाती देशांसह 45 देशांना भेटी व अभ्यास दौरे.

वयाच्या 72 व्या वर्षी ‘शिवसेनेची निर्मिती, वाढ, स्वरूप, यशापयश आणि भारतीय राजकारणातील शिवसेनेचे भवितव्य यांचा विश्लेषणात्मक अभ्यास’ या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सन्मानार्थ डी. लिट. ही मानद पदवी मिळाली.(Manohar Joshi)

2 डिसेंबर 1961 ला नोकरी सोडून कोहिनूर या नावाने क्लासेसपासून व्यवसायाला सुरुवात क्लेई. नंतर कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सुरू केली. शिक्षणापासून वंचित युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे हा त्यामागचा उद्देश होता. आज भारतभर 70 शाखा व दरवर्षी 12  हजारपेक्षा जास्त विद्यार्थाना शिक्षण मिळत आहे. कोहिनूर ग्रुप आज शिक्षण क्षेत्राबरोबरच हॉटेल, हॉस्पिटल, बांधकाम व विकास आणि उर्जा क्षेत्रात महत्त्वाचे कार्य करीत आहे.

शिवसेना वाढवण्यात मनोहर जोशी(Manohar Joshi) यांचा देखील मोठा वाटा आहे. आपलं संपूर्ण राजकीय आयुष्य त्यांनी एकाच शिवसेना पक्षासाठी वाहून दिले होते. विशेष म्हणजे ठाकरे कुटुंबाच्या चार पिढ्यांसोबत काम करण्याची त्यांना संधी मिळाली आहे. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उध्दवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत मनोहर जोशी यांनी काम केले आहेत. 

Manohar Joshi

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Manohar Joshi
Manohar Joshi

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Manohar Joshi
Share the Post:
error: Content is protected !!