ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Manoj jarange

मराठ्यांच्या मताची ताकद काय असते हे 24 तारखेच्या बैठकीत ठरवणार आहोत – Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी परळीमध्ये संवाद बैठक घेतली. याच बैठकीचे रूपांतर एका सभेमध्ये झाल्याचे पाहायला मिळाले. तर, याच सभेत बोलतांना जरांगे म्हणाले की, “बीडसह (Beed) राज्यात मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि गृहमंत्र्यांच यावर एकमत आहे का? म्हणून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहे. पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक आहेत, त्यामुळे खोटे गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही त्यांच्याशी भांडणार आहोत. तसेच, गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून माझ्या घरावर नोटीसा लावल्या जात आहेत असे देखील जरांगे पाटील (Manoj Jarange)म्हणाले. 

मराठ्यांच्या मताची ताकद काय असते हे 24 तारखेच्या बैठकीत ठरवणार आहोत. मराठा समाजाच्या विरोधात सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले आहेत. पण ते चुकीच्या माणसाला भेटले असून, मी समाजाला दैवत मानतो, त्यामुळे मराठा समाजाने एकजूट दाखवावी. आपल्यामध्ये फूट पडू देऊ नये असं म्हणत 24 तारखेला आंतरवाली या ठिकाणी महत्त्वाची बैठक होणार असल्याचे जरांगे म्हणाले. या बैठकीत मराठा समाजाच्या मताची ताकद काय असते यावर निर्णय होणार आहे. तर नऊशे एकरावर सभा कुठे घ्यायची याची देखील घोषणा या बैठकीत करण्यात येणार असल्याचे जरांगे(Manoj Jarange) म्हणाले. 

मनोज जरांगे(Manoj jarange) पाटील यांच्या परळीच्या बैठकीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. शेवटी आयोजकांनी न्यायालयात धाव घेतली आणि बैठकीला परवानगी मिळाली. यावरून देखील जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारला मराठा समाजाबद्दल द्वेष आहे. याच कारणाने बैठकांना परवानगी नाकारली जाते. सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत. त्यांना कायदा लागू होत नाही का? राजकीय नेते सभा घेतात, त्यांना परवानगी मिळते मग आम्ही सामाजिक बैठका घेऊ शकत नाहीत का? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. सरकार जरी आमच्या सोबत अन्यायाने वागत असलं तरी न्यायदेवता योग्य न्याय करेल असं जरांगे म्हणाले.

मुंबई आंदोलनात सगेसोयरे कायद्याबाबत सरकारने आश्वासन दिल्याने जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, आता हा कायदा लागू केला जात नसल्याने जरांगे यांनी यावरून देखील सरकारवर टीका केली आहे. सरकारने खोटे बोलून डाव टाकला असून आता 24 तारखेला मराठा डाव टाकतील. आचारसंहिता लागण्याच्या अगोदर सरकारने सगे सोयरे आधी सूचना जारी करणार म्हणून कॅबिनेट बैठक घेतली होती. मात्र, या बैठकीमध्ये कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. आचारसंहितेचा कारण पुढे करून सरकारने डाव जरी टाकला असला तरी 24 तारखेला जी महत्त्वाची बैठक होणार आहे, त्या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार असल्याचे जरांगे म्हणाले. 

Manoj Jarange

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Manoj Jarange
Manoj Jarange

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Manoj Jarange
Share the Post:
error: Content is protected !!