ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Manoj Jarange

Manoj Jarange : मी निर्भिड आहे. म्हणून माझ्यावर डाव टाकत आहेत. तुम्हाला जे करायचे आहे, ते करा. मी ओबीसीमधून आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही. एसआयटी चौकशी करा. पण अर्धवट चौकशी करू नका.(Manoj Jarange)

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भातील प्रकरणावर एसआयटी चौकशीची घोषणा विधिमंडळात झाली. त्यानंतर मनोज जरांगे(Manoj Jarange) पाटील यांनी आपली भूमिका मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपांवर आपण ठाम असल्याचे त्यांनी म्हटले. SIT चौकशीवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, चांगले आहे. मंत्र्यांची सुद्धा चौकशी होऊ द्या. मला कोणतीही भीती नाही. पण अर्धवट चौकशी करू नका. मी परवाच यासंदर्भात बांधवांना संकेत दिले होते. मला गुंतवण्याची प्रयत्न होतोय, हे सांगितले होते.

देवेंद्र फडणवीस सत्तेचे वापर करणार आहेत. माझा कुठेच दोष नाही. मी कुठे जाण्यास तयार आहे. कुठेही कोणत्याही चौकशी करा, मी तयार आहे. मला पाठिंब्यासाठी कोणाचा फोन नाही. कोणाचे पैसे नाही. मला सर्वात जास्त फोन तुमचे आले आहे. मी तुमचेही प्रकरण काढतो. आता सर्व चौकशी करावी लागेल. त्यातून सुट्टी नाही. ६०० अधिकारी जातील. ज्या मंत्र्यांने आदेश दिले ते जातील.

देवेंद्र फडणवीस यांच्यांकडून षडयंत्र रचले जात आहेत. त्यामुळे मीच त्यांच्या घरी जाणार होतो. आता संपूर्ण समाज त्यांच्या पूर्ण विरोधात गेला आहे. आम्ही आधी 50 वर्षे तुम्हालाच मोठे करण्यात घालवली ना. मी निर्भिड आहे. म्हणून माझ्यावर डाव टाकत आहेत. तुम्हाला जे करायचे आहे, ते करा. मी ओबीसीमधून आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही.दगडफेक हे त्याचे कामच आहे. जे आरोप करत आहेत त्यांनीच दगडफेक करण्यासाठी पाठवले आहे. गुप्तचर यंत्रणेचे लोक व्हिडिओ काढत होते. ती शूटिंग पण आणा, हे पण मी सांगतो. त्या ठिकाणी हजार जण आले आणि हाणायला सुरू केली. मला अटक केली तरी मी तयार आहे. मी फाशीवर जायला भीत नाही. जातीसाठी मरण येईल. फडणवीस यांच्यामुळे मला पवित्र मरण येईल.

Manoj Jarange

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Manoj Jarange
Manoj Jarange

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Manoj Jarange
Share the Post:
error: Content is protected !!