ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Manoj Jarange

Manoj Jarange : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्तेचा वापर करुन पुन्हा काही केलं, तर एकत्र यावं लागेल, असं थेट आव्हानंही मनोज जरांगेंनी(Manoj Jarange) मराठा बांधवांना केलं आहे. 

Manoj Jarange On Devendra Fadnavis : मराठ्यांची लोकसंख्या कमी दाखवली जातेय, असा आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्तेचा वापर करुन पुन्हा काही केलं, तर एकत्र यावं लागेल, असं थेट आव्हानंही मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना केलं आहे.  मंगळवारी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.

बैठक झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या भूमिकेमुळे समाज एकवटला आहे. त्यांना आता सुट्टी देणार नाही. तसेच, येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करणार असा इशाराही यावेळी मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. 

मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange) बोलताना म्हणाले की, मी समाजाचा माणूस आहे. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, बच्चू कडू, प्रकाश आंबेडकर यांचा माणूस आहे, असे आरोप माझ्यावर सातत्यानं होत आहेत. मात्र, मी फक्त समाजाचा आहे. मी कोणाचं ऐकत नसतो. शरद पवार जर आरक्षणाच्या विरोधात बोलले, तर उद्यापासून मी त्यांचाही विरोध करेल. देवेंद्र फडणवीस यांच्या वागणुकीमुळे समाज मोठ्या प्रमाणात एकत्र आला आहे. त्यांच्यासाठी हे आता जड जाणार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. 

तुम्ही एसआयटी चौकशी सुरू केली आहे. काय चुकलं आमचं? तुमच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक आहे. तुमचं राजकीय अस्तित्व धोक्यात आहे, असं मनोज जरांगे(Manoj Jarange) म्हणाले. तसेच, एकनाथ शिंदेंबरोबर चर्चा होऊन आरक्षण देण्यात आलं आहे. मात्र तुम्ही सतत याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात भूमिका घेता असं का? यावर बोलताना जरांगे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मी कधी ही भूमिका घेतली नव्हती. मात्र त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले. ट्रॅप रचला. म्हणून त्यांना विरोध आहे. 

तुम्ही शरद पवार यांचे माणूस आहे असा आरोप होत असतो याबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, शरद पवार उद्या जर मराठा आरक्षणाविरोधात बोलले तर त्यांच्याही विरोधात बोलीन मी. ही संवाद बैठक आहे. लोक एकत्र झाले आहेत. आता त्याचा राजकीय फटका सगळ्यांना बसेल, असं मनोज जरांगे म्हणाले. मला गरज नाही पोलिसांची माझी जात सज्ज आहे, असंही मनोज जरांगे म्हणाले. 

दरम्यान, मराठा आमदार मंत्री हे पक्षाचे काम करतायत. जातीच्या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार का नाही? हे पहाणार आहे समाज. हजारो लोक लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यात येत आहे, हा समाजाचा विषय तो माझा नाही. त्यांना अधिकार आहे. पाच पन्नास लोक उभे राहतील, त्यांचं भविष्य त्यांच्या हातात आहे, असंही मनोज जरांगे(Manoj Jarange) म्हणाले. 

Manoj Jarange

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Manoj Jarange
Manoj Jarange

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Manoj Jarange
Share the Post:
error: Content is protected !!