ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Manoj Jarange

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सहावा दिवस असल्याने त्यांना खूप अशक्तपणा आला आहे. अशक्तपणामुळे जरांगे पाटलांना भोवळ आली. अन्न, पाण्याच्या त्याग आणि औषधोपचारालाही मनाई करणाऱ्या मनोज जरांगे यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली

Manoj Jarange Patil Health Update : आमरण उपोषणाला (Hunger Strike) बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती अतिशय नाजूक (Manoj Jarange Patil Health News) असल्याची चिंताजनक बाब आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सहावा दिवस असल्याने त्यांना खूप अशक्तपणा आला आहे. अशक्तपणामुळे जरांगे पाटलांना भोवळ आली. अन्न, पाण्याच्या त्याग आणि औषधोपचारालाही मनाई करणाऱ्या मनोज जरांगे यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली. यानंतर महंतांनी आग्रहाने जरांगेंनी पाणी पाजलं. पण, जरांगेची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पाणीही घोटवत नाही. त्यामुळे कार्यकर्ते चिंतेत आहेत. जरांगेंच्या आंदोलनस्थळी मोठी गर्दी जमली आहे.

मनोज जरांगे यांना पाणी घेण्याचा आग्रह आंदोलकांकडून करण्यात येत आहे. ‘पाणी घ्या’ म्हणत घोषणाबाजी सुरु आहे. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज जरांगे यांच्या उपोषस्थळी दाखल झाले आहेत. तब्येत खालावली असल्याने आज मनोज जरांगे यांना पाणी पिण्यासाठी जोरदार आग्रह होत आहे. त्यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली. यावेळी सहकारी आणि नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी आग्रह करत जरांगेंना पाणी पाजलं. मनोज जरांगे यांनी एक ग्लास पाणी घेतलं. आंदोलक, सहकारी मित्र आणि महंत शिवाजी महाराज यांच्या आग्रहानंतर त्यांनी पाणी घेतलं.

सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती आणखी (Health Updates) बिघडली आहे. मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा आला आहे. यासोबतच त्यांना पोटदुखीचाही त्रास (Stomach Pain) होत आहे. गुरुवारी (15 फेब्रुवारी) सकाळपासून मनोज जरांगेंची प्रकृती आणखी बिघडली आणि अशक्तपणामुळे त्यांना ग्लानीही आली. जरांगे पाटीलांची तब्येत बिघडत चालल्याने महिलांची रडारड सुरु आहे. जरांगे 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मनोज जरांगे यांना पाणी घेण्याचा आग्रह नागरिक करत आहेत, ‘पाणी घ्या’ म्हणत आंदोलनस्थळी उपस्थितांची घोषणाबाजी सुरु आहे.

आमरण उपोषण करणाऱ्या जरांगेंची भूमिका ठाम आहे. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी आणि अधिसूचनेचं रुपांतर कायद्यात व्हावं, अशी जरांगेंची मागणी आहे. त्यासाठीच जरांगे यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. जालन्यातील आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. सलग सहाव्या दिवशी उपोषण सुरुच असल्याने जरांगे पाटलांची प्रकृती खालावत चालली आहे. जरांगेंना पोटदुखीचा त्रास होत आहे.

Manoj Jarange
Manoj Jarange

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Manoj Jarange
Manoj Jarange

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Manoj Jarange
Share the Post:
error: Content is protected !!