ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Manoj Jarange

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे(Manoj Jarange) यांचे अंतरवली सराटी येथे पुनश्च आमरण उपोषण सुरू झाले आहे . अन्नपाणी त्याग केलेल्या जरंगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली . तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांचा हात जरांगे यांनी झटकला.आज सकल मराठा समाजाच्यावतीनं महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलंय.. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे.. त्यामुळं त्यांची तब्येत खालावत चाललीये.. त्यामुळं जरांगे पाटलांच्या मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी यासाठी हा बंद पुकारण्यात आलाय.

मनोज जरंगे(Manoj Jarange) यांची प्रकृती खालावली आहे. असे असतानाही सरकार याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या कळंब येथील सकल मराठा समाजाने बीड धाराशीव जिल्ह्याच्या सीमेवरील मांजरा नदी पुलावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. विदर्भ , मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र यांचा कनेक्टिंग पॉईंट असलेल्या पुलावरील रास्ता रोकोमूळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत .

Manoj Jarange

आंदोलनस्थळी तणावपूर्ण वातावरण आहे .मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांचे अंतरवली सराटी येथे पुनश्च आमरण उपोषण सुरू झाले आहे . अन्नपाणी त्याग केलेल्या जरंगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठीच सोमवारी कळंब येथे आठवडी बाजाराचा दिवस असतानाही बंद पाळण्यात आला होता .

आता सरकारने जरंगे पाटील यांच्या आंदोलनाकडे गांभिर्याने लक्ष द्यावे या मागणीसाठी कळंब येथे आज सकाळी साडेदहा वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे .यावेळी आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे आंदोलक उपस्थित आहेत . सरकारवर रोष व्यक्त करणार्‍या घोषणा दिल्या जात आहेत . नायब तहसीलदार मुस्ताफा खोंदे , मंडळ अधिकारी टी.डी.मटके यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त याठिकाणी ठाण मांडून आहे.

कळंब येथील मांजरा नदीवरचा पूल हा कळंब अंबाजोगाई , परळी तसेच कळंब केज धारूर माजलगाव , कळंब येरमाळा बार्शी अशा राज्य , राष्ट्रीय महामार्गाला कनेक्ट आहे. विदर्भाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणार्या शेगाव पंढरपूर मार्ग याच पुलावरून जातो. नेमका याच पुलावर रास्ता रोको आंदोलन सुरू आहे . यामुळे मोठ्या वर्दळीच्या मार्गावर एकाअर्थाने नाकाबंदी झाली आहे .दरम्यान , आंदोलनस्थळी टायर जाळण्यात आले आहेत . यामुळे जाळ अन् धुराचे लोट निघत आहेत. कळंब शहराकडे व नदीपल्याडच्या केज तालुका हद्दीत तीन किलोमीटरपेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्या आहेत . जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला जात आहे.

Manoj Jarange

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Manoj Jarange
Manoj Jarange

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Manoj Jarange
Share the Post:
error: Content is protected !!