ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Maratha Reservation

Maratha Reservation : १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासंदर्भात मोठी घोषणा केली. विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा करून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. (Maratha Reservation)

Maratha Reservation : चार दिवसांपूर्वीच मनोज जरांगे(Manoj Jarange) पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं. वाशीतील आरक्षणाचा मोर्चा माघारी केला. मात्र जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा केली. १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासंदर्भात मोठी घोषणा केली. सगेसोयऱ्यांवरून सरकारने काढलेल्या अधिसूचनेची तत्काळ अंमलबजावणी करा, विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा करून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.

आरक्षणासंदर्भात काढलेल्या सगेसोयऱ्यांवरून सरकारने अधिसूचना जारी केली. यालाच अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विरोध दर्शविला आहे. मात्र ही अधिसूचना म्हणजे सरसकट मराठा आरक्षण नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, तुमच्याच त्यावर सह्या आहेत. आता पुढं बघतो असे म्हणत सरकारलाच पुन्हा इशारा दिलाय. मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत ते १० फेब्रुवारीच्या आत मागे घेतले जावेत. फेब्रुवारीतील विशेष अधिवेशनात अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे, अशा मागण्या त्यांनी केल्या.(Maratha Reservation)

सगेसोयऱ्यांबाबत सरकारची भूमिका दुटप्पी आहे. केंद्रात जाण्याची भाषा चुकीची आहे, असा आक्षेपही जरांगे-पाटील यांनी या पत्रकार परिषदेत घेतला. सर्वसामान्य गरीब मराठ्यांसाठी आरक्षण गरजेचे आहे. पुढे काय होईल ते मला माहीत नाही,पण मी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे. प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी या पत्रकार परिषदेत मांडली.

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आल्यावर प्रचंड ऊर्जा मिळते, इथे ऊर्जा मिळणार नाही तर कोठे मिळणार? इथली ऊर्जा ही विजय घेऊनच येते! असे उद्‌गार मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांच्या दर्शनासाठी आले असताना काढले.मराठा समाजाच्या सर्व प्रमुख मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्यानंतर सर्वत्र मराठा समाजाचा जल्लोष पाहावयास मिळत आहे. हे यश मिळताच जरांगे-पाटील यांनी किल्ले रायगडावर शिवरायांचरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेणार असल्याचे जाहीर केले होते.(Maratha Reservation)

त्यानुसार सोमवार, २९ जानेवारी रोजी उशिरा रात्री ते किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे मुक्कामासाठी दाखल झाले आणि मंगळवारी सकाळी ११ वाजता त्यांनी रायगडाच्या दिशेने कूच केली.यावेळी त्यांनी रोपवे सुविधेचा वापर न करता संपूर्णतः गड अनवाणी चढून ते दुपारी अडीच वाजता राजदरबारी छत्रपतींच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी काही निवडक कार्यकर्ते व समाज बांधवांची फौज त्यांच्यासोबत होती.यावेळी प्रसारमाध्यमांनी छगन भुजबळांवरून त्यांना छेडले असता त्यांनी छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच अजित पवार यांनादेखील ते धोकादायक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे सगेसोयरे या शब्दावरून बोलताना त्यांनी, ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडत नाहीत त्यांच्यासाठी ‘सगेसोयरे’ या कायद्याची मंजुरी मिळवली आहे. त्यामुळे एकही मराठा समाज बांधव हा आरक्षणापासून वंचित राहणार नसल्याचे ते म्हणाले. किल्ले रायगडावर दर्शनासाठी आल्यामुळे प्रचंड ऊर्जा मिळाल्याचे सांगत रायगडापेक्षा जगभरात कोणतेच मोठे दैवत नाही, असे बोलून रायगडा चरणी नतमस्तक होण्यासाठी आलोय आशीर्वाद घेऊन पुढे लढणार असल्याचे जरांगे-पाटील यांनी यावेळी सांगितले.(Maratha Reservation)

Maratha Reservation

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Maratha Reservation
Maratha Reservation

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Maratha Reservation
Share the Post:
error: Content is protected !!