ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Maratha

Maratha reservation : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना आणि बीड जिल्ह्यात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अंतरावलीकडे मोठ्या संख्येने पोलिसांची कुमक पोहचली आहे.

Maratha reservation : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय रद्द केला. भांबेरीवरुन गावावरुन ते परत अंतरावाली सराटीत दाखल झाले आहे. त्यानंतर मराठा आंदोलकांचे लक्ष पुन्हा जालना आणि बीड जिल्हा राहणार आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना आणि बीड जिल्ह्यात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अंतरावलीकडे मोठ्या संख्येने पोलिसांची कुमक पोहचली आहे. दंगल नियंत्रण पथक जालन्याकडे आले आहे. तसेच जालना आणि बीड जिल्ह्यात कोणालाही परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही.

मनोज जारांगे यांनी मुंबईला जाण्याची घोषणा केल्यावर पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली. परंतु त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय स्थगित करत पुन्हा अंतरवाली सराटी गाठले. त्यानंतर पोलिसांनी बीड, जालना जिल्ह्याची बॉर्डर सील केली आहे. बीड जिल्ह्यात 38 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. सर्वच वाहनांची आता तपासणी केली जात आहे. बीड जिल्ह्यात 37(1)(3) महाराष्ट्र पोलीस कायदा लागू करण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यांत परवानगी शिवाय कोणालाही प्रवेश नाही.

भांबेरीवरुन माघारी परतल्यानंतर जरांगे पाटील यांनी परत एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करायला सुरुवात केली आहे. तसेच ते वैद्यकीय उपचारही घेत आहेत. परंतु अंबड तालुक्यात संचार बंदी असल्याने कोणीही उपोषण स्थळी थांबू नये, आशा सूचना जरांगे पाटील यांनी केल्या आहेत. आज अंतरवाली सराटीमध्ये शुकशुकाट दिसत आहेत.

मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर बोलण्यास नकार दिला. परंतु उपरोधिक टोला त्यांनी लगावला. ते म्हणाले, अधिवेशन आहे आता मला ही तिकडे बघू द्या. मला जरांगे वर काही बोलायचे नाही. परंतु मी सध्या दोन जुन्या नाटकांचा अभ्यास करत आहे. एक डॉ. काशिनाथ घाणेकर यांच गृह खात्याला जाग येते आणि दुसर म्हणजे सीमेवरून परत जा. ही दोन नाटकांची जुळवाजुळव करायच काम सुरू आहे. मला जरांगे यांच्यावर बोलण्यास वेळ नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांना हा टोला भुजबळ यांनी लगावला आहे.

Maratha

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Maratha
Maratha

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Maratha
Share the Post:
error: Content is protected !!