ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Maratha Protest

Maratha Protest : छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद राहणार आहे.

Maratha Protest : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यभरात आंदोलक देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी एसटी बस (ST Bus) पेटवून देण्यात आल्याची देखील घटना समोर येत आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील (Marathwada) तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद (Internet Service Closed) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गृह विभागाने  हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), जालना (Jalna) आणि बीड (Beed) जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद राहणार आहे. याबाबत गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी आदेश काढले आहेत. 

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत जरांगे फडणवीस यांच्या मुंबईच्या सागर बंगल्यावर निघाले होते. यावेळ जरांगे प्रचंड आक्रमक झाले होते. त्यानंतर आता मराठा समाज देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून पाऊलं उचलले जात आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. 

Maratha Protest

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Maratha Protest
Maratha Protest

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Maratha Protest
Share the Post:
error: Content is protected !!