ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Manoj Jarange

Manoj Jarange : अशीच दडपशाही सुरु राहिल्यास, आधी दोन कोटी मराठे एकत्रित आले होते, आता हाक दिल्यास चार कोटी मराठे एकत्रित येऊन पाणी पाजतील, असे मनोज जरांगे म्हणाले. 

Manoj Jarange : मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा महाराष्ट्रातचा दौरा करत आहेत. दरम्यान, आज ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, सोलापुरात बोलतांना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. “फडणवीस साहेब आचारसंहितापूर्वी आरक्षण द्या, अन्यथा मराठा तुमचा सुपडासाफ करतील. जर अशीच दडपशाही सुरु राहिल्यास आधी दोन कोटी मराठे एकत्रित आले होते, आता हाक दिल्यास चार कोटी मराठे एकत्रित येऊन त्यांना पाणी पाजतील, असे मनोज जरांगे म्हणाले. 

पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, “मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती गठीत करण्यात आली आहे. दरम्यान, शिंदे समितीच्या वतीने शोधण्यात येत असलेल्या कुणबी नोंदींची संख्या आणखी वाढली असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. यापूर्वी 57 लाख नोंदी सापडल्याचा दावा जरांगे यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र, आता याच नोंदी वाढल्या असून, आकडा 63 लाखांवर पोहचला असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्यासह सुमारे 1 कोटी लोकांना आरक्षण मिळणार आहे. तसेच ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना सगेसोयरे कायद्यानुसार आरक्षण मिळेल असेही” जरांगे (Manoj Jarange) म्हणाले आहेत. 

निवडणुकीत निवडून येण्यासाठी तुम्हाला मराठे लागतात, पण यांच्या नेत्यावर बोलले की सगळे तुटून पडतात. पण तुझ्या नेत्याचेचं टांगा पलटी केल्यावर काय करणार?. गोरगरीब मराठ्यांचे मुलं देखील मोठे झाली पाहिजे यासाठी मी लढत आहेत. तुम्हाला नेत्यापेक्षा जास्त जात महत्वाची पाहिजे. पण, जर तुमच्यासाठी नेता मोठा असेल तर जातीकडे येऊ नयेत, असे जरांगे म्हणाले. 

सत्ता आणि मराठा यांच्यातील काटा म्हणजे मनोज जरांगे पाटील असून, त्याला दूर करा, गुंतवा असे धोरण यांनी घेतले आहे. मला जेलमध्ये घातले तरी तिथेही आंदोलन करणार. जेलमधील मराठ्यांना आरक्षण शिकवेल. मुस्लिम, धनगर हे देखील सोबत घेईन. माझी मान कापली, तरी आता ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. मला कोणतेही पद नको, मी आई-बापाला बाजूला केलं. या समाजाने मला आई-बापाची आठवण येऊ दिली नाही, असेही जरांगे (Manoj Jarange) म्हणाले.

Manoj Jarange

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Manoj Jarange
Manoj Jarange

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Manoj Jarange
Share the Post:
error: Content is protected !!