ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Maratha Reservation

Maratha Reservation Survey Ahmednagar : अहमदनगर (Ahmednagar) शहरात तर चक्क शिपाई, बिगारी, सुरक्षा रक्षक यांचीही प्रगणक म्हणून नियुक्ती केल्याने गोंधळ उडाला आहे.(Maratha Reservation)

Maratha Reservation Survey Ahmednagar : राज्य मागासवर्ग आयोगामार्फत (State Backward Classes Commission) होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण तपासण्यासाठी करावयाच्या सर्वेक्षणासाठी चक्क पहिली पास चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर (Ahmednagar) शहरात तर चक्क शिपाई, बिगारी, सुरक्षा रक्षक यांचीही प्रगणक म्हणून नियुक्ती केल्याने गोंधळ उडाला आहे. अशाच एका प्रगणक म्हणून नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. (Maratha Reservation)

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करणाऱ्या बहुतांश चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, काहींना इंग्रजी, मराठी लिहिता, वाचता येत नाही, अशा स्थितीत आम्ही सर्वेक्षणाचे काम कसे पूर्ण करणार, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच, सर्वेक्षणासाठी अहमदनगर महानगरपालिकेत चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या अनेक महिलांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. यातील बहुतांश महिलांचे शिक्षण जेमतेम चौथी ते नववीपर्यंत असल्याने त्यांना सर्वे करतांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे हे सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत संपवण्याच्या सूचना आहे. त्यामुळे या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सून, मुलगा व तर काहींनी पैसे देऊन मुले या कामासाठी आणले असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे त्यांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाहीत. 

Maratha Reservation

मराठा सर्वेक्षणात सतत प्रशासनाचा सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे. सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल एप्लीकेशनमध्ये पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने कामकाज ठप्प पडल्याचे पाहायला मिळाले होते. आता तर चक्क पहिली उत्तीर्ण कर्मचाऱ्याची सर्वेक्षणासाठी नियुक्ती केल्याचे समोर आले आहेत. अहमदनगर महानगरपालिकेकडून सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अशाच एका कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. आपलं शिक्षण कमी असल्याने सर्वेक्षणाचे काम करता येत नसल्याची कबुली हा कर्मचारी देत असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. 

Maratha Reservation

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Maratha Reservation
Maratha Reservation

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Maratha Reservation
Share the Post:
error: Content is protected !!