ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Maratha Reservation

Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं आहे. समाज म्हणून त्यांचा विरोध संपला, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे.(Maratha Reservation)

Maratha Reservation : मराठा समाजाच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. मराठा समाजाने खूप संघर्ष केला आणि आज त्यांचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्रासंबंधित अध्यादेश आणि राजपत्र जारी केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. सगेसोयऱ्यांसाठी या नवीन शब्दाचा उल्लेख पहिल्यांदाच करण्यात आला आहे. राजपत्र आणि अध्यादेश इतक्या लवकर जारी करणे, हे इतिहासात पहिल्यांदाच झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं आहे. समाज म्हणून त्यांचा विरोध संपला, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे.(Maratha Reservation)

”मराठा समाजाचा लढा यशस्वी ठरल्याने आज मराठा समाजाची दिवाळी असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. मराठा समाज खूप आनंदी आहे, यापेक्षा आणखी काय हवं. मराठा मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. इथंपर्यंत आलो ही मेहनत, ताकद वाया नाही गेली, याचं समाधान आहे. गोदा पट्ट्यांतील 123 गावांनी खूप साथ दिली, संबंध महाराष्ट्रातील मराठा समाज पाठीशी उभा होता, म्हणून हे यश मिळालं आहे,” असं जरांगे म्हणाले आहेत.

मनोज जरांगे यांनी वाशीतील विजयी रॅलीदरम्यान सांगितलं की, “मराठा समाज मुंबईकडे निघताच सगेसोयऱ्यांचा आदेश निघाला आहे. हा विजय माझा नसून सर्व मराठा समाजाचा आहे. सर्व गुन्हे मागे घेण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. हा विजय मराठा समाजाचा आहे. मराठा समाजासाठी अध्यादेश निघणं ही साधीसुधी गोष्ट नव्हती. मराठ्यांनी आतापर्यंत संघर्ष केला आहे. सगेसोयऱ्यांच्या बाबतीत देखील आदेश निघाला आहे. शिंदे समिती पुन्हा कुणबी नोंदी शोधण्याचा काम करणार आहे.”

Maratha Reservation
Maratha Reservation

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Maratha Reservation
Maratha Reservation

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Maratha Reservation
Share the Post:
error: Content is protected !!