ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Vasant More

Vasant More : लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे.

Vasant More : लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा …, असं म्हणत मनसेला रामराम करत असल्याचं वसंत मोरे यांनी ट्विट करत सांगितलं आहे.

एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो… त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो. ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो, अशी पोस्ट वसंत मोरे यांनी आज सकाळी फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टमधून वसंत मोरे नाराज असल्याचं स्पष्ट दिसत होतं. आता अखेर त्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

काय म्हणाले वसंत मोरे?

ज्या शहरांमध्ये ज्या लोकांबरोबर माझ्या राजकीय जीवनातील 15 वर्ष घालवली, पण हेच पदाधिकारी वसंत मोरेला तिकीट मिळायला नको, पक्ष संघटनेने निवडणूक लढवायला नको असे निगेटीव्ह अहवाल राज ठाकरे यांच्यापर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं अशा लोकांपर्यंत काम करणं मला जमणार नाही. त्यामुळे मी माझ्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. मी माझ्या स्वत:च्या हातांनी परतीचे दोर कापले आहेत. (Vasant More)

संघटनेच्या अनेक लोकांचे फोन आले. मी सामान्य कार्यकर्त्यांचे फोन घेतले. पण मी कोणत्याही नेत्याचा फोन घेतला नाही. कारण मी या सगळ्या गोष्टी वारंवार नेत्यांपर्यंत पोहोचवल्या. पण नेत्यांना या गोष्टी का कळत नाहीयत? तुम्ही आता का मला फोन करताय? माझी तडफड एवढ्या दिवसांत तुम्हाला कळली नाही का? वसंत मोरे स्वत:साठी कधीच लढला नाही. सामान्य पदाधिकाऱ्यांसोबत रडत आला आहे. जी लोकं माझ्यासोबत काम करत आहेत त्यांना दाबण्याचा प्रयत्न होतो.(Marathi News)

माझ्या माणसांवर चुकीच्या कारवाई होत असतील, त्यांच्याबरोबर राहून काय करायचं आहे? मी त्यासाठी राज ठाकरे यांच्याकडेही वेळ मागितली होती. पण राज ठाकरे सुद्धा मला बोलले नाहीत. मला वाटतं अशा पद्धतीने पुणे शहरात राजकारण होणार असेल तर अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं. माझा वाद आजपर्यंत राज ठाकरे आणि मनसे सोबत नव्हता. पण ज्या चुकीच्या लोकांच्या हातात पुणे शहरात पक्ष दिला, मी काल रात्रभर झोपलो नाही. पण इतकं सर्व कुणी मला काल का विचारलं नाही? मला आज का फोन करत आहात? निवडणूक लढवणं हा माझा गुन्हा आहे का? पक्ष संघटना वाढवण्यासाठी निवडणूक लढवली पाहिजे.(Breaking news)

वसंत मोरे (Vasant More) यांचं राजीनाम्याचं पत्र

प्रति, मा. श्री राजसाहेब ठाकरे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

विषय: माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदर्भात.

आपणांस सप्रेम जय महाराष्ट्र..!

पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे.

भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ‘कोंडी’ करण्याचे ‘तंत्र’ अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती.

धन्यवाद..!

आपला विश्वासू, वसंत (तात्या) मोरे कात्रज पुणे.

Vasant More

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Vasant More
Vasant More

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Vasant More
Share the Post:
error: Content is protected !!