ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Ajit Pawar

Ajit Pawar : शरद पवार यांचं नाव आणि फोटो कुठल्याही स्तरावर वापरणार नाही, असं लेखी स्वरूपात द्या अशी सूचना न्यायालयाकडून अजित पवार गटाला देण्यात आली आहे

Ajit Pawar : अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून उठाव केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली. राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार(Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी शरद पवार(Sharad Pawar) गट अशा दोन्ही गटांकडून राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नावावर दावा करण्यात आला होता. मात्र राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव हे अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला. त्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.

सुनावणी दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तीवाद केला. अजित पवार गटाकडून शरद पवार यांचं नाव आणि  फोटो वापरला जात असल्याचा आरोप सिंघवी यांनी केला. तसेच यावर आक्षेप देखील घेतला. अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयात काही पोस्टर दाखवले, अजित पवार गटाचे हे पोस्टर्स पाहा, त्यावर शरद पवारांचा फोटो आहेत, अजित पवार शरद पवारांचा(Sharad Pawar) फोटो आणि घड्याळ चिन्ह कसं वापरतात? त्यांना आमचा फोटो, घड्याळ वापरण्याची परवानगी देऊ नका ही आमची मागणी आहे, असा युक्तीवाद सिंघवी यांनी केला.

दरम्यान याची दखल घेत न्यायालयानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगलंच फटकारलं आहे.  शरद पवार यांचं नाव आणि फोटो कुठल्याही स्तरावर वापरणार नाही, असं लेखी स्वरूपात द्या अशी सूचना न्यायालयाकडून देण्यात आली आहे. तसेच तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा शरद पवार यांचा फोटो वापरू नका असंही यावेळी कोर्टानं म्हटलं आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 मार्चला होणार आहे.

Ajit Pawar

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Ajit Pawar
Ajit Pawar

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Ajit Pawar
Share the Post:
error: Content is protected !!