ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Nilesh Lanke

Nilesh Lanke : निलेश लंके हे लोकसभेसाठी इच्छुक असून ते भाजपच्या सुजय विखे पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. 

Nilesh Lanke : लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला (Ajit Pawar) मोठा धक्का बसला असून आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे आज शरद पवार (Sharad Pawar) गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आता भाजपच्या सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुजय विखे पाटील अशी लढत होणार हे नक्की झालंय. 

निलेश लंके हे पारनेरचे आमदार असून अजित पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. दक्षिण अहमदनगरमधून ते लोकसभेसाठी इच्छुक होते. पण अजित पवार गटाला तीन ते चारच जागा मिळण्याच्या चर्चेमुळे त्यांची चांगलीच अडचण झाली होती. आता शरद पवारांची साथ दिल्यानंतर ते लोकसभेचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. 

लोकनेते लवकर निर्णय घ्या, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ‘तुतारी’ वाजवा अशी साद काहीच दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना घातली होती. कोल्हेंच्या त्या आवाहनाला आता निलेश लंके यांनी प्रतिसाद दिला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा या कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. पण यामध्ये अहमदनगर मतदारसंघाची चांगलीच चर्चा आहे. खासदार सुजय विखे पाटील विरुद्ध  आमदार निलेश लंके असा सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये दोन्ही गटाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतंय. विशेष म्हणजे या दोन्ही कार्यक्रमात निलेश लंकेंच्या पत्नी देखील सक्रिय होताना दिसत आहेत. 

Nilesh Lanke

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Nilesh Lanke
Nilesh Lanke

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Nilesh Lanke
Share the Post:
error: Content is protected !!