ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

चंद्रकांत दादा

नेवासा – तालुक्यातील सुलोचना बेलेकर सामाजिक व बहुउद्देशीयशिक्षण संस्था भानस हिवरे या बेलेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संस्थेमध्ये आज बुधवार दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी गुरुमाऊली परमपूज्य सद्गुरु श्री चंद्रकांत मोरे दादा यांचा भव्य सत्संग व हितगुज सुसंवाद मेळावा संपन्न झाला यावेळी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर श्री सुरेशरावजी बेल्हेकर व संस्थेच्या उपाध्यक्षा डॉक्टर सौ रंजनाताई सुरेश बेल्हेकर यांनी यावेळी परमपूज्य चंद्रकांत दादा मोरे दादा यांचे पाद्य पूजन करून शाल व श्रीफळ व मोठा गुलाब पुष्पांचा हार घालून यथोचित सत्कार केला तसेच सद्गुरु परमपूज्य गुरुमाऊली मोरे दादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट त्रंबकेश्वर यांचे मार्फत एक हजार खाटांचे हॉस्पिटल तयार होत आहे त्यासाठी एक लाख एक हजार एकशे आकरा रुपयांचा धनाकर्ष प्रदान करण्यात आला.

यावेळी सद्गुरु चंद्रकांत दादा मोरे यांचे आमच्या संस्थेला पाय लागल्यामुळे आमच्या संस्थेला साधुसंतांचा सहवास लाभला त्यामुळे संत येती घरा तोची दिवाळी दसरा असा आनंद द्विगुणित करण्यात आला प्रास्ताविक डॉक्टर सौ डॉक्टर रंजनाताई बेल्हेकर यांनी केले. परमपूज्य चंद्रकांत दादा यांनी संस्थेच्या विद्यार्थी व कर्मचारी वर्गाला अध्यात्मिक क्षेत्राची माहिती व सत्संगाबद्दल श्री अक्कलकोट स्वामी यांचे स्वामी समर्थ यांचे प्रार्थना चिंतन व आपल्या आयुष्यात आरोग्य व शिक्षण आहार विहार कसा असावा व जीवनात दररोज आई-वडिलांची सेवा करावी आई वडील घरी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये आई-वडिलांचे फोटो ठेवून आई-वडिलांचे फोटोला वंदन करून दिनचर्या सुरू करावी असेही मार्गदर्शन केले.

त्यामुळे जीवनात काहीच कमी पडणार नाही स्वामी समर्थांची सेवा करावी रोज तुळशीच्या अकरा माळा जप कराव्यात
स्वामी समर्थांची भक्ती करावी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा आशीर्वाद अक्कलकोट स्वामी नेहमीच देत असतात याबद्दल सविस्तर विवेचन केले विविध प्रकारचे दाखले देऊन आयुर्वेद बी ए एम एस या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणातील काय बारकावे असतात ते सांगितले तसेच बी एम एस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आमच्या त्रंबकेश्वर येथील हॉस्पिटलमध्ये किमान सहा महिन्याची सेवा मोफत द्यावी अशी याचना त्यांनी केली त्यास विद्यार्थ्यांनी होकारार्थी प्रतिसाद दिला. ज्ञानेश्वर इंटरनॅशनल व ज्ञानेश्वरपब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विशेषतः मुलींनी लेझीम खेळाचे माध्यमातून मोरेदादांचे स्वागत केले, फटाक्यांची आतिषबाजी व बी ए एम एस च्या विद्यार्थिनींनी व ॲग्री कॉलेजच्या विद्यार्थिनींनी केलेल्या विविध रंगाच्या रांगोळ्यांची सजावटीने व आकर्षक फुलांची रोषणाई व गुलाब पुष्पांची वृष्टी दादांच्या अंगावर करण्यात आली.

चंद्रकांत


सवाद्य मिरवणूक करून परमपूज्य मोरेदादांचे व त्यांचे सेवेत असलेले दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्राचे संस्थेची सेवेकरी श्री विष्णू कडेल सर श्री नंदकिशोर नाटकर व सेवेकरी भगिनी यांचे स्वागत केले यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री अभिषेक बेल्हेकर, पृथ्वीराज बेल्हेकर, गौरव निमसे बी ए एम एस चे प्राचार्य डॉक्टर नारायणराव भालसिंग सर, डॉक्टर स्नेहा ओहोळ, श्री शर्मा, श्री शिवनारायण वाघे सर, श्री अनंत जोशी सर.श्री तांबारे सर,श्री वाल्हेकर सर,श्री विघे सर,श्री नाथाभाऊ शिंदे पत्रकार, महेश फडताळे, मिलिंद देशमुख संजय बर्वे गणेश अंबाडे जावेद पठाण जितेंद्र कोळी जितेंद्र सोनवणे अभिषेक माकोणे श्री राहुल बनसोडे सर श्रीरोहन कांडेकर सर,श्री तुकाराम खाटीक सर, पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्री हेमंत अहिरेसर, श्री अजित तांबे सतीश घोरपडे एमबीए स्टाफ, बीएडच्या प्राचार्य सौ स्वाती वाघे मॅडम डॉक्टर तुरबटमट सर श्री माने सर श्री सागर सोनटक्के सर श्री भोसले सर श्री कर्डक सर ॲग्री कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनी बी ए एम एस चे विद्यार्थी विद्यार्थिनी व सर्व शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यासह उपस्थित होते.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चंद्रकांत
चंद्रकांत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चंद्रकांत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!