ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आंदोलन.

नेवासा – सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नेवासा नगरपंचायतीच्या तिर्थक्षेत्र ज्ञानेश्वर मंदिर कडे जाणार्या रस्त्यावर पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्याच्या निषेधार्थ आज मी नेवासकराच्या वतीने जागरण गोंधळ घालुन केले अनोखे आंदोलन. या वेळी समर्पण संघटनेचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी सदर आंदोलनाला पाठिंबा देऊन नेवासा शहरातील उद्भभवणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्यांना वाच्या फोडुन नेवासा शहरातील पिण्याचा पाणीपुरवठाचा प्रश्न असो.

आंदोलन

घनकचरा व्यवस्थापन, किंवा आरोग्य विभागाचा तिर्थक्षेत्र विकासासाठी अशा अनेक प्रकारच्या समस्यांना वाच्या फोडुन संबंधित विभागाचा निषेध व्यक्त करुन तसेच मगरुर अधिकाऱ्यांना सरळ करून नेवासा शहराच्या हितासाठी सैद्यव नेवासकरा सोबत राहुन काम करत रहाणार असे उद्वगार या वेळी आंदोलनात डॉ करणसिंह घुले यांनी केले. तसेच बांधकाम विभाग आणि नेवासा नगरपंचायतीच्या चुकीच्या धोरणांमुळे तिर्थक्षेत्र ज्ञानेश्वर मंदिर कडे जाणार्या रस्त्याची वाताहत झाली आहे.

आंदोलन

मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्या मुळे छोटं मोठ्या अपघात होऊन जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांना मनःस्ताप होत आहे.जर या वर संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेवर पडलेले खड्डे आणि नगरपंचायतची फुटलेली पिण्याच्यी पाईप लाईन दुरुस्ती न केल्यास या पेक्षा ही तिव्र आंदोलन करण्यात येईल असे उद्वगार संघटनेचे शांताराम गायके केले.
सदर आंदोलनाच्या ठिकाणी येऊन नेवासा नगरपंचायतचे अधिकारी म्हस्के साहेब यांनी निवेदन देण्यात आले तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची नगरपंचायत मध्ये बैठक घेऊन खड्डे बुजविण्याचे काम केले जाईल अशी ग्वाही म्हस्के साहेब यांनी आंदोलकांना या वेळी दिली.

आंदोलन

या वेळी विकास चव्हाण, संतोष राजगिरे, संतोष चव्हाण, अनिल सोनवणे, राजु कनगरे, रामदास ईरले, गणेश चांगले, प्रकाश चव्हाण, मनेश चव्हाण, बबलू शेख, शुभम चव्हाण व जागरण गोंधळाचा कार्यक्रम करणारे लक्ष्मण गोंधळी यांच्या ताफेचा शहरातील नागरिकांनी रात्रीचा होणार जागरण गोंधळाचा कार्यक्रम दिवसा होऊन ते प्रशासनचा विरोध करण्यासाठी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आंदोलन
आंदोलन
आंदोलन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आंदोलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!