सहा दिवशीय ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी वाचक मंडळींना देवस्थानच्या वतीने दिलेल्या प्रेमाच्या हाकेला साथ दिल्याबद्दल त्यांचे देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी मनःपूर्वक धन्यवाद व आभार मानले. देवगड देवस्थान येथे कीर्तन मंडपामध्ये हा सप्ताहाच्या निमित्ताने पारायण सोहळा संपन्न झाला .आज ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता झाली, त्याप्रसंगी ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाचे देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते मंत्र उच्चारण करून ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करून सांगता करण्यात आली.
यावेळी देवगड देवस्थानचे गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज बोलताना म्हणाले की एवढ्या थंडीच्या दिवसांमध्ये भक्तांनी पारायण वाचण्यासाठी मोठा भरगच्च प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे देवस्थानच्या वतीने गुरुवर्य महंत महाराजांनी अभिनंदन व आभार मानले तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की ज्या ज्या वेळी देवस्थानच्या वतीने आपल्याला हाक देण्यात येईल त्यावेळेस आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवहान त्यांनी सर्व उपस्थित वाचक मंडळींना केली. देवगड देवस्थानचे गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या सांगता प्रसंगी बोलत होते.
यावेळी देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजीगिरीजी महाराज यांच्या हस्ते ग्रंथाचे पूजन करण्यात आले. तसेच या प्रसंगी देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज ,देवगड देवस्थानचे उत्तर अधिकारी स्वामी प्रकाशानंगिरीजी महाराज यांचे पिताश्री ह. भ .प दिनकर महाराज मते,विनेकरी ह.भ.प ससे महाराज देवगड देवस्थानचे चोपदार बाळकृष्ण महाराज कानडे, ह.भ.प बाळासाहेब जाधव, ह.भ.प संजय महाराज निथळे, ह.भ.प पेचे महाराज ह .भ.प शहाजी महाराज आदि महाराज मंडळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचनासाठी व्यासपीठावरती उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.