कुकाणा – नेवासा तालुक्यातील आर्ले पाटील पतसंस्था सातत्याने आर्थिक व्यवहारत विश्वास निर्माण करणारी तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने निश्चित भरारी घेईल असे प्रतिपादन आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी कुकाणा येथे आर्ले पाटील पतसंस्थेच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा कार्यक्रमा प्रसंगी केले.लंघे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाट्न सपन्न झाले, प्रसंगी
व्यासपीठावर भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे, सरपंच दिनकरराव गर्जे, मा. सरपंच एकनाथराव कावरे, डॉ. बाळासाहेब कोलते, दौलतराव देशमुख, सोमनाथ कचरे, वैभव नवले,भाऊसाहेब सावंत,प्रताप चिंधे, आदी मान्यवर होते, सर्वांचे स्वागत आर्ले पाटील पतसंस्थेचे संस्थापक डॉ. गणेश आर्ले पाटील यांनी केले.

संस्थेच्या वतीने डॉ. गणेश आर्ले, व्यवस्थापक व्यवस्थापक नितीन मेहेत्रे, रूपा शिंदे, कृष्णा कोलते, यांनी आमदार विठ्ठलराव लंघे यांचा विधानसभा सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. प्रसंगी मछिंद्र कावरे, किरण शिंदे, प्रदीप भांडारी, भागवत खराडे, समीर पठाण, सुभाष चौधरी, डॉ. शिवाजी देशमुख, डॉ. सुभाष भागवत,डॉ. सुजात पठाण अमोल वाबळे, असिफ सय्यद, महादेव साबळे,आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संचालक कृष्णा कोलते यांनी मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.