ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
सरपंच

सरपंच संतोष देशमुख खुनातील व सरपंच कृष्णा शिंदे यांना धमकी देणाऱ्या आरोपीना कडक शिक्षा करावी यामागणीचे निवेदन तहसीलदार नेवासा यांना दिल्याचे व २ जानेवारी २०२५ गुरुवार रोजी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत बंद ठेऊन निषेध करणार असल्याचे लोकसेवक सरपंच संघटना नेवासा तालुका अध्यक्ष सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले

दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हंटले आहे की सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा गेल्या काही दशकातील महाराष्ट्रातला सर्वाधिक निर्घृण खुन आहे जल्लादांना ही पाझरफुटावा राक्षसाचा ही आत्मा थरथर कापावा इतक्या पाशवीपणे सरपंचाला मारले गेले आहे सदर घटनेतील चार आरोपी पकडले गेलेले आहे परंतु मुख्य आरोपी अद्याप मोकाट फिरत आहे त्यास अटक करून सर्वांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे

सरपंच

तसेच नेवासा तालुक्यातील बिलपिंपळगाव चे सरपंच कृष्णा शिंदे यांना निनावी पोस्टाने संतोष देशमुख यांचे सारखे तुकडे करू अशी धमकी देण्यात आलेली आहे याबाबत पोलीस प्रशासनाने संतोष देशमुख प्रमाणे गुन्हा दाखल करायला विलंब न करता तातडीने कारवाई करावी अन्यथा सरपंच संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच सदर दोन्ही घटनेचा निषेध म्हणून गुरुवार दिनांक 2 /1 /2025 रोजी नेवासा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे काम बंद ठेवून निषेध करणार आहे

या संदर्भात तहसीलदार संजय बिरादार यांनी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे सांगितले आहे,

सरपंच

निवेदनावर संघटना अध्यक्ष शरदराव आरगडे वडुलेचे सरपंच मार्गदर्शक दिनकरराव गर्जे, कौठा सरपंच उपाध्यक्ष प्रमोद गजभार, हंडीनिमगाव सरपंच महिला आघाडी अध्यक्ष पुजाताई भिवाजी आघाव, देडगाव सरपंच चंद्रकांत मुंगसे, सुरेशनगर सरपंच शांताबाई उभेदळ, नजिक चिंचोली सरपंच वनमाला चावरे, चिलेखनवाडी सरपंच भाऊसाहेब सावंत, बाभुळखेडा सरपंच ज्ञानेश्वर औताडे, वंजारवाडी सरपंच सुनंदा दराडे आदीच्या सह्या आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सरपंच
सरपंच

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सरपंच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!