ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
एकादशी

घरात आई व दारात गायीमुळे भारतीय संस्कृती जगात महान – ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज इंगळे

नेवासा – नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर असलेल्या  सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमामध्ये गुरुवर्य महंत उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सफला एकादशीच्या निमित्ताने आयोजित किर्तन सोहळयास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारतीय संस्कृतीचे जगाला नेहमीच कुतूहल व आकर्षण राहिलं आहे. कारण घरात आई व दारात गाई अशी महान संस्कृती आपली राहिली असल्याने विश्वामध्ये भारतीय संस्कृती महान असल्याचे प्रतिपादन सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे विद्यार्थी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज इंगळे यांनी यावेळी झालेल्या किर्तन सोहळयाप्रसंगी बोलतांना केले.

एकादशी

यावेळी बोलतांना हभप इंगळे महाराज म्हणाले की दुर्दैवाने आज विज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगात व पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे आपली संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या संस्कृतीचे जतन करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले. सफला वद्य एकादशीच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमातील विद्यार्थ्यांनी ब्रम्हलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज व सकल देवतांचे पूजन करून आरती केली. तदनंतर सकाळी १० वाजता ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज इंगळे यांची कीर्तनरूपी सेवा संपन्न झाली.

एकादशी

हभप इंगळे महाराज पुढे म्हणाले की, जीवनामध्ये माणसाने दोन गोष्टीं केल्याशिवाय मरूच नये. त्या म्हणजे माणसाने जीवनात गुरु केल्याशिवाय व ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय. कारण संत आपल्याला आत्मउद्धाराचा मार्ग दाखवतात तर ग्रंथामध्ये आपल्याला जन्म, मरणाचा उलगडा होतो,संतांचे कार्य अलोकिक आहे. संतांची समाजाने अवहेलना केली परंतु संतांनी नेहमीच जगत कल्याणाचा विचार केला. संतांचे समाजावर अनंत उपकार आहेत, गुरु हे परब्रम्ह आहे. गुरूंशिवाय जीवन अपूर्ण आहे. मानवी जीवाचं हित व अहित कशात आहे याचं ज्ञान गुरूंकडून मिळते. आज वारकरी सांप्रदायातील त्यागी महात्मा असलेल्या गुरुवर्य बाबा ह.भ.प.महंत उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या सावलीत आम्ही सर्व विद्यार्थी वारकरी शिक्षण घेत आहोत हे आमचं परमभाग्य. बाबा आमची खूप काळजी घेतात. आमचे भजन, हरिपाठ, गीतापाठ रोज स्वतः बाबा घेतात. ही आमच्यासाठी विशेष बाब आहे. खरं तर बाबांच्या या ऋणातून उतराई होणं कदापि शक्य नाही.कीर्तनानंतर वेगवेगळ्या प्रकारची सेवा देणाऱ्या दात्यांचा सन्मान करण्यात आला.

एकादशी

यावेळी स्व. सौ. उर्मिलाताई मदनलाल देसरडा यांच्या स्मरणार्थ भाजपचे युवा नेते सचिन देसरडा व देसरडा परिवाराच्या वतीने फराळ प्रसाद पंगत देण्यात आली. गुरुवर्य बाबा ह.भ.प.महंत उद्धवजी महाराज मंडलिक, नेवासेकर यांच्या वतीने आश्रमाचे शिक्षक बाळासाहेब झिने यांनी उपस्थित भाविकांचे स्वागत करून आभार मानले. यावेळी पंचक्रोशीतील भजनी मंडळ, भाविक भक्त उपस्थित होते.

एकादशी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

एकादशी
एकादशी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

एकादशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!