नेवासा – नेवासा पोलिसांनी शहरातील जुने कोर्ट गल्ली येथे दोन ठिकाणी छापा टाकून सुगंधी तंबाखू, मावा तयार करून विक्री करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून ३ लाख १८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, दि. २९ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास जुनी कोर्ट गल्ली येथे छापा टाकून एक हजार रुपये किमतीचा एक किलो सुगंधी मागवा, एक लाख ७३ हजार ५०० रुपये किमतीचे सिल्व्हर रंगाचे सुगंधी तंबाखूचे ३४७ पुढे, २२ हजार ५०० रुपये किमतीचे सोनेरी रंगाचे सुगंधी तंबाखूच्या विलो वजनाच्या १५ बँग ८८ हजार रुपये किमतीच्या काळ्या रंगाच्या सुगंधी तंबाखूचे २२ पुडे असा २ लाख ५ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नावेद फज्जू शेख, रा. जुनी कोर्ट गल्ली नेवासा तसेच सुरेंद्र प्रसाद रा. नोएडा (दिल्ली) या दोघांवर सुगंधी गुटखा पानमसाला व मावा शरीरास अपायकारक आहे हे माहीत असताना त्याची विक्री करण्यासाठी कब्जात बाळगल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरी फिर्याद पोलीस नाईक संदीप दरंदले यांनी दिली. पावणेतीन वाजेच्या सुमारास छापा टाकून कोर्ट गल्ली येथील रियाज बाबा शेख (वय ३२) व सुरेंद्रप्रसाद (नोएडा) याचे ताब्यातून सुगंधीत तंबाखू,सुपारी, तंबाखू पुडे व मावा तयार करण्यासाठी लागणारे दोन यंत्र असा १ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे म्हटले आहे. सुरेंद्र प्रसाद (नोएडा) हा फरार झाला आहे. दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही घटनांमध्ये भारतीय न्याय संहिता कलम २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) व अन्न औषधे मानके अधिनियम २००६ व नियमन २०११ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.