छत्रपती संभाजीनगर येथील मॉडर्न स्कूलमध्ये दुपारच्या सुमारास शाळेत मधली सुट्टी झाल्याने अनेक विद्यार्थी मैदानात खेळत होते. त्याचवेळी अचानक आक्रमक झालेला रेडा धावत शाळेच्या मैदानात शिरला. रेडा शिरल्याचं पाहताच शाळेत एकच गदारोळ झाला. सर्व विद्यार्थी आरडाओरड करूं लागले. त्यावेळी शाळेतील शिक्षकांनी तातडीने विद्यार्थ्यांना वर्गात जाण्याची सूचना केली. तसेच रेड्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, या हल्ल्यात १५ विद्यार्थी जखमी झाले. त्यानंतर शाळा प्रशासनाने जखमी विद्यार्थ्यांना घाटी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. तसेच, विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती त्यांच्या पालकांना देण्यात आली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.