घोडेगाव | अविनाश येळवंडे – नेवासा येथील ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा होत असलेल्या नळाद्वारे येणाऱ्या पाण्यातून उग्र असा वास येत असून, हा वास थायमेट सदृश्य विषारी औषधाचा असल्याचा संशय नागरिकांना येत आहे, घोडेश्वरी देवी मंदिर परिसर, चेमटे गल्ली व जुना चांदा रोड वरील काही भागात वास येत असल्याने याबाबत प्रभाग क्र ६ चे मा.ग्रा.सदस्य वसंतराव सोनवणे यांनी तातडीने सर्व प्रभागात फिरून पाण्याची तपासणी केली व पाण्याचे नमुणे घेतले, अनेक कुटुंबियातील नागरिकांनी व लहान मुलांनी हे पाणी पिले असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार दि. ६ जानेवारी रोजी ११ वाजेच्या दरम्यान गावातील पाणीपुरवठा वाहिनी द्वारे घरोघरी नळाद्वारे पाणी आले, पाणी भरताना या पाण्याचा अतिशय उग्र असा वास येत असल्याचे काही महिलांच्या लक्षात आले, याबाबत खात्री करण्यासाठी पाणी पुरवठा कर्मचारी व वसंतराव सोनवणे यांनी तातडीने सर्वत्र पाण्याची पाहणी केली, जो पर्यंत पाण्याचा नमुना तपासून अहवाल येत नाही तो पर्यंत हे पाणी वापरू नये अशी सूचना केल्या. पाण्याचा नमुना घेतला असून तपासणी साठी अधिकृत कर्मचारी आलेला नाही, संपर्क केला असून अद्याप नमुना कुणी ताब्यात घेतला नसल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

पाण्यातून विषारी थायमेट चा वास कसा येतोय व हा वास दुसरा कशाचा आहे का हे तपासणीअंती कळेल परंतु, परिसरात नागरिक भयभीत झाले असून ग्रामपंचायत वर प्रशासक असल्याने नागरिकांना समस्या मांडण्यासाठी मोठी अडचण होत असून, ग्रामसेवक फक्त मंगळवार व शुक्रवारी येत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, आरोग्य विभाग व ग्रामंचायतने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
प्र. क्र. ६ मध्ये पाण्यात उग्र वास येत असल्याची बातमी गावात पसरली व त्यानंतर गावातील विविध भागात असा उग्र वास येत असल्याचे अनेकांनी संगीतले, सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत देखील नमुना तपासणीसाठी घेतला नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला नाहीतर ग्रामपंचायत समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे उपस्थित महिलांनी सांगितले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.